आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेतील ‘फिरस्ती’ बहाद्दरांची अाता अाधारबेस्ड हजेरी; लाेकेशन पडताळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कधी विभागीय कार्यालयातील कामकाज, तर कधी स्पाॅट व्हिजीटच्या नावाखाली ‘फिरस्ती’वर असणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना चाप अाणि कामाची शिस्त लावण्यासाठी अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी ‘अाधारबेस्ड’ हजेरी प्रणाली सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला अाहे. त्यासाठी सल्लागाराची नेमणूक केली असून त्यांच्याकडून कशा पद्धतीने साॅफ्टवेअरद्वारे हजेरी घेता येईल या दृष्टीने अभिप्राय मागवला अाहे. 
 
महापालिकेतील कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी अायुक्तांनी कठाेर भूमिका घेतली अाहे. कागदाेपत्री कारवाईमुळे नुकसान नकाे, या उद्देशातून शाब्दिक फटके देण्याची बाब अायुक्तांच्याच अंगलट अाणण्याचा प्रयत्न झाल्यामुळे त्यांनी अाता कडक पवित्रा घेतला अाहे. त्याचाच एक भाग म्हणून, सकाळी बायाेमेट्रिक थम्बद्वारे हजेरी लावून सायंकाळपर्यंत चकाट्या पिटणाऱ्यांवर वचक ठेवला जाणार अाहे. त्यासाठी अाधारबेस्ड हजेरी प्रणाली सुरू केली जाणार अाहे. त्यात कर्मचाऱ्याला स्पाॅटवरून काय काम करताे अाहे, याचा पुरावा दिला जाणार अाहे. त्यात माेबाइलद्वारे त्याच्या लाेकेशनची जीपीएस पद्धतीने पडताळणी केली जाणार अाहे. अर्थात, हे सर्व अजून प्राथमिक स्तरावर असून सल्लागाराकडून अहवाल अाल्यानंतर हजेरी प्रणाली लागू केली जाणार अाहे. प्रामुख्याने सफाई कर्मचारी, शिक्षक, अाराेग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, बांधकाम, नगररचना, पाणीपुरवठा व्हाॅल्व्हमन ते अभियंता यांना ही प्रणाली लागू हाेणार अाहे. यामुळे नागरिकांचे हेलपाटे थांबण्याची शक्यता अाहे.

... ताेपर्यंत खातेप्रमुखाची जबाबदारी 
बायाेमेट्रिक हजेरी प्रणालीत वारंवार उशिरा येणाऱ्यांसह दांडीबहाद्दरांचा शाेध घेतला जाणार अाहे. त्यासाठी संगणक विभागाला नजर ठेवण्याच्या सूचना केल्या अाहेत. याव्यतिरिक्त खातेप्रमुखांनीही असे कर्मचारी काेण, याची यादी देण्याविषयीचे अादेश अायुक्तांनी दिले अाहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...