आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत्या अपघातांनंतर मोबिलिटी सेलबाबत महापालिकाच उदासीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- समस्या सोडवण्याची इच्छाशक्ती नाही, मात्र केवळ सामाजिक संस्था वा लोकांच्या दबावामुळे कागदोपत्री काम करण्याची बाब कशी असते, याचा अनुभव दोन दिवसांपूर्वी महत्त्वाचे शासकीय अधिकारी ट्रॅफिक विषयात रस असणाऱ्या सामाजिक संस्थांनी घेतला. महापालिकेने वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर बोलावलेली मोबोलिटी सेलची बैठक कोणतेही कारण देता तहकूब तर केलीच, मात्र ज्यांनी बैठक बोलावली असे अधिकारीही अनुपस्थित असल्यामुळे महत्त्वाची कामे सोडून हजर झालेल्यांकडे राग व्यक्त करण्यापलीकडे काहीच उरले नाही. 
पालिका क्षेत्रात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याचे प्रमुख कारण सिंहस्थात चारशे कोटींचे रिंगरोड पालिकेने १९२ कोटी खर्चून अंतर्गत बाह्य क्षेत्रात निर्माण केलेले रस्त्यांचे चकचकीत जाळे ठरत आहे. या रस्त्यावर वाहन दामटल्यामुळे वाहनचालक स्वत:बरोबरच पादचाऱ्यांना नियमानुसार वाहन चालवणाऱ्यांच्या जीवासाठी धोका पोहाेचवत आहेत. मार्चमध्ये मैत्रिणी असलेल्या दाेन विद्यार्थिनींच्या मातांना वेगवेगळ्या घटनांमध्ये जीव गमवावा लागला. त्यानंतर वाहतुकीच्या नियमांचा मुद्दा एेरणीवर आला. रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग, स्पीडब्रेकर्स, रॅमलर नसणे अशा तक्रारी करीत पालिका काय करते असाही प्रश्न उपस्थित झाला हाेता.
 
 या पार्श्वभूमीवर मोबोलिटी सेल कार्यान्वित करण्याची मागणी जोर धरू लागली. वास्तविक हा सेल यापूर्वीच स्थापला असून ताे अस्तित्वात आल्यानंतर एकच बैठक झाल्याने दुसऱ्या बैठकीला मुहूर्त सापडला. एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता बैठक घेण्याचे ठरले. त्यानुसार बैठक बोलावलेले उपप्रादेशिक परिवहन विभाग, सहपोलिस आयुक्त, विभागीय नियंत्रक, एस.टी, नगररचना सहायक संचालक, आय.डी.टी.पी, यू.एम.टी.सी, दिल्ली, राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, महावितरण अधीक्षक अभियंता, नाशिक फर्स्ट संस्थेचे प्रतिनिधी यांच्यासह पालिकेच्या विविध खात्यांचे अधिकारी बोलावले होते. प्रत्यक्षात विविध खात्यांचे प्रतिनिधी आल्याने बैठक झालीच नाही. आता आयुक्त अभिषेक कृष्णा हे प्रशिक्षणासाठी मसुरी येथे महिनाभर गेल्याने बैठकीला पुन्हा कधी मुहूर्त सापडेल अत्यंत महत्त्वाचा मोबोलिटी सेल कार्यान्वित होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
 
महत्त्वाचे विषय राहिले कागदावरच 

नवीन चौकात सिग्नल, रस्त्यावर आॅन आॅफ स्ट्रीट पार्किंग करणे, चौकांलगत झेब्रा पट्टे मारणे, स्पीड ब्रेकरचे धोरण ठरविणे, वाहतुकीबाबत अभ्यास करणाऱ्या संस्थांचे सादरीकरण आयत्यावेळी वाहतुकविषयक आलेल्या प्रश्नांबाबत चर्चा हे महत्त्वाचे विषय कागदावरच राहिले. 
बातम्या आणखी आहेत...