आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिकेची अंतिम प्रभागरचना उद्या हाेणार जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारतीय जनता पक्षासाठी साेयीची प्रभागरचना केल्याचा शिवसेनेचा अाराेप, तर दुसरीकडे खुद्द भाजपच्याच काही नगरसेवकांनी प्रभागातील नियमबाह्य माेडताेडीबाबत थेट न्यायालयीन लढाई लढण्याबाबत दिलेले इशारे, या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या ३१ प्रभागांच्या प्रारूप रचनेवर राज्य निवडणूक अायाेगाचा शुक्रवारी (दि. २५) निर्णय हाेणार अाहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर करताना अायाेग काेणते बदल करताे, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले अाहे.
महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक साधारण फेब्रुवारीत अपेक्षित अाहे. या निवडणुकीसाठी सप्टेंबरपासूनच प्रक्रिया सुरू झाली. महापालिकेने १२२ जागांसाठी चार सदस्यीय पद्धतीनुसार एक याप्रमाणे ३१ प्रभाग तयार केले. या प्रारूप प्रभागरचनेला विभागीय अायुक्तांची मान्यता घेत राज्य निवडणूक अायाेगाकडे मान्यतेसाठी पाठवले. अायाेगाने तत्त्वत: मान्यता देत १० अाॅक्टाेबरला प्रारूप प्रभागरचना महापालिकेला जाहीर करण्यास सांगितले.

प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर २५ अाॅक्टाेबरपर्यंत त्यावर हरकती मागवण्यात अाल्या हाेत्या. या हरकतींवर प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी हाेऊन हरकतदार महापालिका या दाेघांच्या म्हणण्याचा एकत्रित अहवाल निवडणूक अायाेगाने घेतला. अाता या सर्वांचा विचार करून प्रारूप प्रभागरचनेत गरज भासल्यास नियमानुसार याेग्य ते बदल करण्याचे अधिकार वापरून निवडणूक अायाेग अंतिम प्रभागरचना २५ नाेव्हेंबरला जाहीर करणार अाहे. प्रभागरचना जाहीर हाेण्यास दाेन दिवस बाकी असल्यामुळे त्यातील बदलांबाबत उत्कंठा शिगेला पाेहाेचली अाहे.

...तर अारक्षणही बदलणार
अंतिम प्रभाग रचनेत प्रारूपपेक्षा अधिक बदल हाेऊन त्याचा संबंध लाेकसंख्येशी राहणार असेल तर अारक्षण साेडतही नव्याने घ्यावी लागेल, असे महापालिका सूत्रांचे म्हणणे अाहे. तसे झाले तर सध्या अारक्षणामुळे रस्ते बंद झालेल्या मंडळींना पुन्हा एक संधी उपलब्ध हाेऊ शकते. दुसरीकडे, अारक्षणामुळे सुखावलेल्यांचीही चिंता कायम असून या पार्श्वभूमीवर दाेन्ही बाजूंचे लक्ष जाहीर हाेणाऱ्या अंतिम प्रभागरचनेकडे लागले अाहे.
शिवसेनेचेही लक्ष
महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असाच प्रमुख संघर्ष असेल, असे तूर्तास चित्र अाहे. या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभागरचनेवर प्रभावाच्या मुद्यावरून या दाेन्ही पक्षांत कुरघाेडीचे राजकारण रंगले हाेते. तुलनेत हरकतदारांमध्ये भाजप काहीसा साैम्य हाेता. मात्र, शिवसेनेचे प्रवक्ते भगवान भाेगे यांनी थेट शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप यांच्याशी संबंधित प्रभाग क्रमांक च्या रचनेवर अाक्षेप घेतले हाेते. सानप यांचे चिरंजीव मच्छिंद्र लढण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रभाग क्रमांक मध्ये साेयीस्कररित्या जादा मतदार समाविष्ट केले गेल्याचा अाराेप हाेता. ‘शेजारील प्रभागाची लाेकसंख्या कमी असताना याच प्रभागात जास्त’ यामागे प्रभावक्षेत्रातील मतदारांना समाविष्ट करून घेण्याचा प्रकार असल्याचाही भाेगे यांचा दावा हाेता. याबराेबरच, भाजपचे प्रदेश पदाधिकारी वसंत गिते यांचा प्रभाग १५ शहराच्या मध्यवर्ती भागात असताना येथे तीन सदस्यीय प्रभाग कसे झाले, असाही अाक्षेप हाेता. वास्तविक, शहराच्या काेपऱ्यातील एखादा प्रभाग तीन सदस्यीय असायला हवा हाेता, अशी हरकत हाेती.
बातम्या आणखी आहेत...