आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका अायुक्तांची अाता प्रशासनाची स्वच्छता माेहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कामकाज, प्रशासनात निर्माण झालेली मक्तेदारी, अपुऱ्या मनुष्यबळाच्या नावाखाली महत्त्वाच्या कामांना बगल देण्याचे वाढते प्रमाण या सर्वांवर अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी कठाेर उतारा याेजण्याचे ठरवले अाहे. केंद्र राज्याच्या महत्त्वाच्या याेजनांबराेबरच महापालिकेच्या महत्त्वाच्या कामांकडे पाठ दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई केली जाणार अाहे. एकप्रकारे प्रशासनातच स्वच्छ माेहीम हाती घेतल्याचे चित्र असून त्याचाच एक भाग म्हणून महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या दाेन अधिकाऱ्यांना नाेटिसाही बजावल्याचे वृत्त अाहे. 
 
महापालिकेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून लाेकसंख्या वाढल्यामुळे कामाचा बाेजाही वाढला अाहे. दुसरीकडे अपुरे मनुष्यबळ असल्याचे कारण देत पालिकेची कायमच बचावत्मक भूमिका राहिली अाहे. मात्र, स्मार्ट सिटीत नाशिकचा समावेश झाल्यामुळे जबाबदारी वाढली असून, अाता या शर्यतीत वेग वाढवून काम करणे अपरिहार्य ठरले अाहे. अशा परिस्थितीत प्रशासनातील काही अधिकारी स्मार्ट सिटी त्यानुषंगाने महत्त्वाच्या प्रश्नांबाबत काहीसे बेफिकीर असल्याचे दिसून अाले अाहे. वर्षानुवर्षे एकाच जागेवर साेयीचे विषय सांभाळल्यामुळे काही अधिकारी सुस्तावलेही अाहेत. त्यांची मक्तेदारी निर्माण झाली असून, सत्ताधारी वा अायुक्त काेणीही अाले वा गेले तरी अापला बालही बाका हाेत नाही, असा समजही त्यांच्यात दृढ झाला अाहे. त्यातून केंद्र राज्य शासनाच्या महत्त्वाच्या याेजनांनाच हरताळ फासण्याचे प्रकार सुरू झाले असून, प्रशासनाच्या दृष्टीने पर्यायाने शहराच्या दृष्टीने अाता अशी टाेलवाटाेलवी घातक वळणावर येऊन ठेपली अाहे. या संदर्भात विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून, त्यातून अायुक्त विरुद्ध अधिकारी असा संघर्ष असल्याचे चित्र काहीजणांकडून निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले अाहे. दरम्यान, त्यास दाद देता अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी धाडसी निर्णय घेत बेशिस्त अधिकाऱ्यांच्या मुसक्या अावळण्याचा निर्णय घेतला अाहे. त्याचेच एक पाऊल म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या दाेन अधिकाऱ्यांना नाेटिसा पाठवल्या असून, एका अधिकाऱ्याची माेघम अर्जाद्वारे महिनाभराची रजाही नाकारल्याचे वृत्त अाहे. 

स्वेच्छानिवृत्तीच्या अस्त्राद्वारे दबाव 
महापालिकेत अपुऱ्या मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर काेणतीही कारवाईची वेळ अाली की स्वेच्छानिवृत्तीच्या अस्त्राद्वारे दबाव निर्माण करण्याचे प्रकारही मागील काळापासून सुरू झाले अाहेत. अाताही काही अधिकारी स्वेच्छानिवृत्तीची भीती दाखवून प्रशासनावर अप्रत्यक्षपणे दबाव टाकत असल्याचे बाेलले जात अाहे. या पार्श्वभूमीवर असे प्रस्ताव फेटाळून त्यांच्याकडून काम करून घेण्याचे अाव्हान अायुक्तांसमाेर अाहे. 

बहिरम, महाजनांवर कारवाई 
अनेक वर्षांपासून उपायुक्त म्हणून असलेले अार. एम. बहिरम यांच्यावर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या असून, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा पंतप्रधान अावास याेजनेचे वेळेत सर्वेक्षण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवल्याचे समजते. जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर ४५ दिवसांत ते पूर्ण करण्याची मुदत हाेती. मात्र, एप्रिल पूर्ण झाल्यानंतरही सर्वेक्षण पूर्ण झाल्याने त्यांना नाेटीस बजावून याबाबत विचारणा झाल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे यापूर्वी शासनाच्या एका परिपत्रकाची अंमलबजावणी केल्यामुळे वादात सापडलेले मुख्य अग्निशामक अधिकारी अनिल महाजन यांची माेघम उत्तराद्वारे महिनाभराची रजा नामंजूर केल्याचे वृत्त अाहे. महाजन हे बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण अशा क्रेडाईच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांना नाेटीस बजावण्यात अाल्याचे सांगितले जाते. सद्यस्थितीत अग्निशामक विभागासमाेर अनेक महत्त्वाची कामे असून जुनी हाॅस्पिटलचे नवीन नियमाद्वारे नूतनीकरण करण्याची तातडीची कामे अाहेत. या पार्श्वभूमीवर महाजन यांची रजा नाकारल्याचे बाेलले जाते. 
बातम्या आणखी आहेत...