आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसा सफाई कर्मचारी दिसेना, रात्रपाळीच्या सफाईवर 35 लाखांचा चुराडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एकीकडे शहरात दिवसाच सफाई कर्मचाऱ्यांचे दर्शन घडणे माेठे मुश्कील असताना अाता रात्रपाळीत स्वच्छतेच्या नावाखाली दरमहा ३५ लाख रुपयांचा चुराडा हाेत असल्याची धक्कादायक माहिती पुढे अाली अाहे. त्यामुळे अाराेग्य विभाग पुन्हा वादात सापडण्याची शक्यता असून, रात्रपाळीत हाेणारी सफाई काेणाच्या जीवावर हाेते असे स्पाॅट नेमके काेणते याबाबत उत्सुकता वाढली अाहे. 
 
स्वच्छ शहरांच्या यादीत पिछाडीवर पडलेल्या नाशिक महापालिकेने पुढील स्पर्धेत किमान पहिल्या क्रमांकात येण्यासाठी धडपड सुरू केली अाहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रथम दहा शहरांत नाशिक येईल, असा अाशावाद व्यक्त केला हाेता. त्यामुळे महापालिकेची जबाबदारी वाढली असून, पालिकेने सफाईशी संबंधित विविध बाबीत लक्ष घातले अाहे. पालिकेला अाजघडीला वाढती लाेकसंख्या नववसाहतीच्या पार्श्वभूमीवर किमान हजार सफाई कामगार अावश्यक अाहेत. मात्र, सद्यस्थितीत ही संख्या अतिशय अपुरी अाहे. यातील अनेक कामगार प्रत्यक्ष कर्तव्यास येत नसल्याचे चित्र असून, काही ठिकाणी नियमित कर्मचाऱ्यांनी अापल्या कार्यक्षेत्रात उपकामगार नेमून ‘हाथ की सफाई’ दाखवण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा अाहे. 
 
मध्यंतरी महापाैर रंजना भानसी यांनी पंचवटी विभागात भेट दिल्यानंतर सफाई कर्मचारी शेडवर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणीही नसल्याचे अाढळले हाेते. विभागीय स्वच्छता निरीक्षकही कसेबसे दाैरा सुरू झाल्यानंतर हजर झालेले हाेते. भाजप नगरसेवक जगदीश पाटील यांनीही प्रभाग क्रमांक मध्ये दाेन दिवस सकाळी हजेरी शेडवर ठिय्या मांडल्यानंतर कर्मचारी अाढळलेले नव्हते. थाेडक्यात, दिवसाच सफाई कामगारांची वानवा असताना महापालिकेच्या अाराेग्य विभागाने रात्रपाळीत शहराची सफाई हाेते असा दावा केला अाहे. स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी मागविलेल्या माहितीत अाराेग्य विभागाने सहाही विभाग मिळून मासिक ३५ लाख रुपये रात्रीच्या सफाईवर खर्ची पडत असल्याचा दावा केला अाहे. 
 
सातपूर विभागात मुकादम तर ७२ कर्मचाऱ्यांमार्फत रात्रीची सफाई हाेत असल्याचा दावा केला अाहे. जूनमध्ये रात्रपाळीपाेटी लाख ९६ हजार १३५ रुपये अदा करण्यात अाले अाहे. नाशिक पूर्व विभागात तब्बल मुकादम रात्रीच्या वेळेत काम करीत असून, त्यात नियमित तर कामाच्या साेयीनुसार कार्यरत अाहेत. ७० कर्मचारी रात्रीची सफाई करीत असून, मे महिन्यात लाख २९ हजार ६२८ रुपये अदा करण्यात अाले अाहे. सिडकाे विभागात मुकादम ७५ कामगार असून, जून महिन्यात लाख ७२ हजार ९७६ रुपये अदा करण्यात अाले अाहे. पंचवटीत मुकादम, वाहनचालक ७० कामगार असून, मे महिन्यात लाख ७९ हजार ९४१ रुपये अदा करण्यात अाले अाहेत. नाशिकराेड विभागात स्वच्छता मुकादम, वाहनचालक तर ७० कामगार असून, त्यांना लाख ९३ हजार ६६४ रुपये अदा करण्यात अाले अाहेत. नाशिक पश्चिम विभागात मुकादम ७० सफाई कामगार असून, त्यांना जून महिन्यात लाख २१ हजार ७३२ रुपये रात्रपाळीचा भत्ता दिला अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...