आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डांबरी रस्त्याचा ‘ताप’; थंडाव्यासाठी ‘लक्ष्मी’च्या पायाला आयुर्वेदिक लेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्रात अगदी मोजकेच हत्ती शिल्लक आहेत. त्यापैकी एक नाशिकमधील लक्ष्मी हत्तीण. वय ३६ वर्षे. दिंडोरी रस्त्यावरील पंचदशनाम आहवन आखाड्यात  तिचे वास्तव्य असते. जंगलात दाट झाडांमुळे हत्तींचे कळप दिवसा दाट सावलीच्या ठिकाणी मुक्काम करतात. जवळपास नदी किंवा तलाव असेल तर ते दिवसभर त्यात मनसोक्त डुंबतात. शहरात मात्र डांबरी किंवा सिमेंटच्या रस्त्यावरून चालावे लागत असल्याने हत्तींच्या पायाला चटके बसतात. बरेचदा तर त्यांच्या तळपायाला त्यामुळे मोठ्या जखमाही होतात. लक्ष्मी हत्तीण सध्या या त्रासातून जात आहे.
 
४० अंशांवर तापमान गेल्याने लक्ष्मी अस्वस्थ 
तापमानाचा पारा ४० च्या वर गेल्यावर लक्ष्मी अस्वस्थ झाली. त्यामुळे आता तिच्या आहारातदेखील बदल करण्यात आला आहे. पाच किलाे बाजरीच्या पिठासह पाच किलाे गूळ, सव्वा किलाे अाेवा, अर्धा किलाे काळे जिरे अाणि २० जायफळ यांचे मिश्रण तिला खायला देतात. पाेटदुखी हाेत असल्यास अाेवा, लसूण, काथ, हिंग यांचे मिश्रण दिले जाते. उसाच्या बांड्या, गवत, घासही तिला नियमितपणे दिले जाते. शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी तिला राेजच अांघोळ घातली जाते.
 
पुढील स्लाईडवर वाचा, थंडाव्यासाठी तळपायाला लेप, उन्हाळ्यात लहान मुलासारखी काळजी घेताे...  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...