आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे 145 अभ्यासक्रम पूर्णत: हाेणार बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात १४५ अभ्यासक्रम यंदापासून बंद करण्याचे अादेश विद्यापीठ अनुदान अायाेगाने दिले अाहेत. आज नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहिलेल्या घटकांसाठी मुक्त विद्यापीठातर्फे वेगवेगळ्या शिक्षणक्रमांच्या माध्यमातून प्रवाहात येणे शक्य हाेत अाहे.
या विद्यापीठातर्फे २२० शिक्षणक्रम चालवले जात असून त्याद्वारे सात लाख विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असताना विद्यापीठाच्या १४५ शिक्षणक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताच नसल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक शिक्षणक्रमास विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असणे आवश्यक असताना विद्यापीठाने मान्यता घेतली नाही.
विद्यार्थी वंचित राहणार
एकदम एवढे शिक्षणक्रम बंद होण्याच्या मार्गावर असल्याने लाखो विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या अभ्यासक्रमांना नाही मान्यता : पत्रकारिता, अभियांत्रिकी, डिप्लोमा, आर्किटेक्चर, डी. एम. एल.टी, बीएससी, बी. ए. डिझायनिंग यांसह १४५ शिक्षणक्रमांना मान्यता नसल्याने बंद केले जाणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...