आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : मुक्त विद्यापीठातील घोटाळ्यांच्या ‘सीबीआय’ चौकशीची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्त विद्यापीठातील घाेटाळ्यांची चाैकशी करावी या मागणीसाठी ‘दिव्य मराठी’तील बातम्यांचे पाेस्टर्स गळ्यात अडकवून अांदाेलन करताना मनविसेचे पदाधिकारी. - Divya Marathi
मुक्त विद्यापीठातील घाेटाळ्यांची चाैकशी करावी या मागणीसाठी ‘दिव्य मराठी’तील बातम्यांचे पाेस्टर्स गळ्यात अडकवून अांदाेलन करताना मनविसेचे पदाधिकारी.
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संकेतस्थळ, अभ्यासक्रम, बोगस पदाेन्नत्यांसह परीक्षा विभागात काेट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचे उघडकीस आल्यानंतरही दोषींवर कारवाई केली जात नसल्याचा अाराेप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने या संपूर्ण प्रकरणाची ‘सीबीआय’ चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तर मुक्त विद्यापीठातील बी. एस्सी. एमएलटी या विद्याशाखेत शिक्षण घेणाऱ्या तब्बल हजार विद्यार्थ्यांच्या निकालात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे समोर आले असून, या विद्यार्थ्यांचे निकालाची चाैकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली. 
 
‘पुरे झाला ‘मुक्त’ घोटाळ्यांचा खेळ, आता बसवा सीबीआय चौकशीचा मेळ’, ‘मुक्तपणे घोटाळे करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजेत’, ‘परीक्षा विभागाची ‘परीक्षा’ घ्यावीच लागेल’ अशा विविध घोषणा देत मंगळवारी (दि. १८) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात अाले. कुलगुरू इ. वायुनंदन यांना निवेदन देत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, शहराध्यक्ष श्याम गोहाड, तुषार मटाले, रोहन जगताप, नितीन धाणापुणे, संदेश जगताप, अमर जगदाळे, अमोल भांबर, प्रतीक राजपूत, विशाल पुरभे, विजय उदावंत आदींच्या उपस्थिीत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, विद्यापीठाने पाच वर्षांपूर्वी तयार केलेल्या ycmou.ac.in या वेबसाइटच्या कामात लाखो रुपयांचा अपहार, बी.एस्सी. या अभ्यासक्रमासाठी पुस्तके पूर्ण करता विद्यापीठाकडून लाखो रुपये घेण्यात आले. विज्ञान तंत्रज्ञान विभागातील कोर्सच्या व्हिडिआे लेक्चर्समध्येही १० लाखांहून अधिक रकमेचा घोटाळा झाला. तसेच परीक्षा विभागातही ४० लाख उत्तरपत्रिकांच्या छपाईला एका प्रतीसाठी रुपये असा दरही ठरला हाेता. प्रत्यक्षात मात्र काेऱ्याच उत्तरपत्रिका हाती पडल्याने तब्बल ८० लाख जास्त अदा केल्याचे उघडकीस अाले अाहे. त्याचबरोबर ८५ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच गहाळ झाल्या आहेत. तसेच, या उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगसंदर्भातही कुठलीही माहिती परीक्षा विभागाकडे नाही. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. हे सर्व प्रकरण गंभीर असून, त्याची विद्यापीठाने तातडीने ‘सीबीआय’ चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. तर अ.भा.वि.प.ने मुक्त विद्यापीठातील बी.एस्सी. एमएलटी विद्याशाखेत शिक्षण घेणाऱ्या तब्बल हजार विद्यार्थ्यांच्या निकालात घोळ झाल्याची तक्रार करत या विद्यार्थ्यांच्या निकालाची फेरतपासणी परीक्षा विभागाच्या चौकशीची मागणी केली. 
 
व्यवस्थापन मंडळाकडे प्रकरण सादर करणार.. 
विद्यापीठाशीनिगडितजे प्रकरणे बाहेर निघत आहे. या प्रकरणाशी निगडित सर्व रेकाॅर्ड जमा केले जात आहे. सर्व प्रकरण विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीकडे सादर केले जाईल. त्यानंतर अधिक चौकशी केली जाईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या निकालाची फेरतपासणी केली जाईल.
- इ. वायुनंदन, कुलगुरू, मुक्त विद्यापीठ 
 
‘दिव्य मराठी’च्या बातम्यांचा दिला ‘अल्बम’ 
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने गेल्या २९ जूनपासून तर आतापर्यंत विद्यापीठाच्या घोटाळासंबंधित प्रसिद्ध झालेल्या सर्व बातम्यांचा ‘खेळ ‘मुक्त’ घोटाळ्यांचा’ असा अल्बम तयार करून कुलगुरूंना देण्यात आला. तसेच हाच घोटाळ्यांचा अहवाल समजून व्यवस्थापक मंडळांकडे सादर करावा, अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...