आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदोबस्तात व्यस्त कर्मचाऱ्यांचा थकवा दूर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महिनाभरापासून मोर्चा, गणेशाेत्सव, नवरात्रोत्सव आणि आताच्या तळेगावच्या घटनेनंतर शहरात कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा थकवा कोजागरी पाैर्णिमेला काहीसा दूर झाला. पोलिस आयुक्तांनी सर्व अधिकारी अाणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह कोजागरी साजरी केली. यावेळी संगीताचा अास्वाद घेत बंदोबस्ताचा ताणतणाव दूर केला. प्रथमच पोलिसांसाठी असा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
शहर पोलिस गेल्या महिनाभरापासून विविध बंदोबस्तात व्यस्त आहेत. तळेगाव घटनेनंतर शहरात निर्माण झालेला तणावामुळे पोलिसांची साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आल्याने चार दिवस सर्व अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरून कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करत होते. त्यामुळे शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. शहरात शांतता ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाचा सिंहाचा वाटा आहे. सुयोग्य नियोजन आणि चोख बंदोबस्त, तत्काळ कारवाईमुळे शहरात काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता सर्वत्र शांतता होती. सोमवार ते शनिवार या सहा दिवसांपासून अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे जाणवत होता. आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधत पौर्णिमेच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांसाठी साग्रसंगीत कार्यक्रमाचे आयोजन केले. पोलिस आयुक्तालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी या कार्यक्रमाचा आनंद घेत पाैर्णिमा साजरी केली. प्रथम पोलिसांनी कोजागरी पौर्णिमा एकत्रित साजरी केल्याने गेल्या महिनाभारापासून बंदोबस्ताच्या तणावात असलेले सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस उपआयुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, सचिन गोरे, विजयकुमार चव्हाण, अतुल झेंडे, मोहन ठाकूर, शालिग्राम पाटील यांच्यासह १३ पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावेल
^बंदोबस्तातकुटुंबीयांपासूनदूर असलेले अधिकारी कर्मचाऱ्यांना कुठलेही सणोत्सव साजरा करता येत नाहीत. पाैर्णिमा साजरी केली, त्याप्रमाणे आता दिवाळी सण अशाच प्रकारे साजरा केला जाईल. एकत्रित कार्यक्रमांनी पोलिसांचे मनोबल उंचावेल. शारीरिक, मानसिक थकवा दूर होईल. -डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलिस आयुक्त
बातम्या आणखी आहेत...