आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विराेधाने विषय समित्यांत मनसेची लाॅटरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  उपसूचनेच्या अाधारे विषय समित्या गठित केल्या जात असल्याचे कारण दाखवत काँग्रेस, राष्ट्रवादीने यासंदर्भातील प्रस्तावाला महासभेत जाेरदार विराेध दर्शविला. शिवाय या पक्षांनी सदस्यांच्या नावांची शिफारस करण्यासह नकार दिल्याने त्याचा फायदा मनसेला मिळाला. तीनही विषय समित्यांवर मनसेच्या प्रत्येकी एका सदस्याची वर्णी लागली. या शिवाय भाजपचे पाच अाणि शिवसेनेच्या तिघा सदस्यांची नियुक्ती महासभेत जाहीर करण्यात अाली. प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसेने केलेल्या मदतीची परतफेड यानिमित्ताने भाजपने केल्याचे बाेलले जात अाहे. 
 
पालिकेतील सत्ताधारी भाजपने अापल्या अधिकाधिक सदस्यांना विविध पदांवर कामाची संधी मिळावी यासाठी शहर सुधार अाराेग्य अाणि विधी अशा तीन विषय समित्या पुनर्स्थापित केल्या अाहेत. यात ताैलनिक संख्याबळानुसार भाजपचे ९, शिवसेनेचे काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रत्येकी याप्रमाणे सदस्य नियुक्त हाेणार हाेते. त्यासाठी झालेल्या महासभेत काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला जाेरदार विराेध दर्शविला. विषय समित्यांसदंर्भात अायुक्तांनी महासभेत प्रस्ताव सादर केला नसल्याने, तसेच या समित्यांच्या कामकाजाचे नियमही स्पष्ट नसल्यामुळे ताे महासभेवर ठेवू नये, अशी भूमिका या पक्षांनी घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे, अपक्ष गटनेते गुरुमित बग्गा, डाॅ. हेमलता पाटील, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, सुधाकर बडगुजर यांनी प्रस्तावास विराेध दर्शविला. तर शिवाजी गांगुर्डे, दिनकर अाढाव, उद्धव निमसे, शशिकांत जाधव, संभाजी माेरुस्कर यांनी प्रस्तावाच्या बाजूने मत मांडले. 

काँग्रेस,राष्ट्रवादीचा पत्ताच कट : काँग्रेस,राष्ट्रवादीने विषय समित्यांच्या प्रस्तावाला विराेध दर्शवित सदस्यांच्या नावांची शिफारसही केली नाही. त्यामुळे मनसेला लाॅटरी लागले. परिणामी काँग्रेस-राष्ट्रवादीला या तीनही समित्यांपासून दूर राहण्याची वेळ अाली. शिवसेनेने एकीकडे विराेधाची भूमिका घेतली असताना दुसरीकडे सदस्यांच्या नावांचीही शिफारस केली. 

विराेधाची देण्यात अाली ही कारणे 
{सदस्यांच्या उपसूचनेनुसार हा प्रस्ताव ठेवण्यात अाल्याने त्याला वैधानिक अाधार नाही. 
{ महासभेवरचे प्राकलने हे अायुक्तांनी सादर करणे गरजेचे असताना या प्राकलनाच्या बाबतीत तसे झालेले दिसत नाही. - सदर समित्यांच्या जबाबदाऱ्या अाणि कार्यक्षेत्र काेणते असतील या विषयी अनभिज्ञता 
{ निधी मंजुरीचा अधिकाराबाबत स्पष्टता नाही 

तीनही सभापती भाजपचेच हाेणार 
तीनही विषय समित्यांवर भाजपचे प्रत्येक पाच सदस्य अाहेत. विराेधी पक्षातील शिवसेनेचे तीन सदस्य असून मनसेचा एक सदस्य अाहे. त्यामुळे या तीनही समित्यांच्या सभापतीपदावर भाजपच्याच नगरसेवकाला संधी मिळेल हे अाता स्पष्ट झाले अाहे. 

अाराेग्य समिती 
भाजप- सतीश कुलकर्णी, अंबादास पगारे, रूपाली निकुळे, शांताबाई हिरे, छाया देवांग 
शिवसेना - किरण गामणे, हर्षदा गायकर, रंजना बाेराडे 
मनसे - याेगेश शेवरे 

शहरसुधार समिती 
भाजप- स्वाती भामरे, पंडित अावारे, रुची कुंभारकर, भगवान दाेंदे, सुदाम नागरे. 
शिवसेना - सत्यभामा गाडेकर, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले 
मनसे - सुरेखा भाेसले 

विधीसमिती 
भाजप- शीतल माळाेदे, प्रा. शरद माेरे, हिमगाैरी अाहेर, राकेश दाेंदे, नीलेश ठाकरे. 
शिवसेना - पूनम माेगरे, नयन गांगुर्डे, संताेष गायकवाड. 
मनसे - सलीम शेख 
बातम्या आणखी आहेत...