आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरडे रामकुंड टँकरने भरण्याच्या पालिकेच्या उपायावर फिरले पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिकमध्ये देशभरातून दरराेज येणाऱ्या भाविकांच्या साेयीसाठी महापालिका प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करून रामकुंड पाण्याने भरण्यात आले होते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रामकुंडात भरलेले पाणी दुर्गंधीयुक्त बनले आहे. पात्रात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचल्याने दुर्गंधी पसरली असून, भाविक रामकुंडात स्नान करण्याचे टाळत असल्याने टँकरच्या उपायावर पाणी फेरले गेल्याचे दिसत अाहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. परिणामी, गोदापात्रासह रामकुंड काेरडेठाक पडले होते. रामकुुुंडात पाणीच नसल्यामुळे भाविकांना धार्मिक कार्य, स्नान कुठे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. धार्मिक कार्य, स्नानासाठी आलेल्या भाविकांना कोरड्या पडलेल्या रामकुंडाच्या दर्शनावरच समाधान मानावे लागत होते. कोरड्या पडलेल्या रामकुंड परिसरातील मुलांनी क्रिकेटचाही डाव मांडला हाेता. गुढीपाडव्यानिमित्त हजारोंच्या संख्येने अालेल्या भाविकांच्या सोयीसाठी उर्वरित.पान

कोरडे रामकुंड टँकरने भरण्याच्या उपायावर फिरले पाणी
पालिकाप्रशासनाने रामकुंडात टँकरद्वारे पाणीपुरवठा करून भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रामकुुंडात भरलेल्या पाण्याची योग्य निगा राखण्याकडे प्रशासनाकडून साफ दुर्लक्षच करण्यात आल्याने रामकुुंडातील पाणी प्रदूषित झाल्याचे चित्र शनिवारी बघावयास मिळत होते. परिणामी, पवित्र समजल्या जाणाऱ्या रामकुंडातील पाण्याला जणूकाही गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले हाेते. प्रवाही नसलेल्या पाण्यात साचलेले निर्माल्य, अन्नपदार्थ आदी वस्तूंमुळे पाण्यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. परिणामी, या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकडून रामकुंडात स्नान करणे तर दूरच, पाणी अंगावर घेण्याचेदेखील टाळले जात आहे. उलट दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे भाविकांच्या अारोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकत असल्याने रामकुंडात पाणी टाकण्याचा उपाय जणू काही रोगापेक्षा इलाज भयंकर असाच बनला आहे. रामकुंडाच्या झालेल्या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

गोमुखातीलपाण्यावरच समाधान : रामकुंडातीलपाणी दुर्गंधीयुक्त बनल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकडून गोमुखातून पडणाऱ्या पाण्यावरच स्नान करण्यावर समाधान मानले जात आहे. रामकुंडाच्या झालेल्या या अवस्थेमुळे अनेकांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

अन्यपर्यायांचा विचार व्हावा
रामकुंडात टँकरद्वारेपाणीपुरवठा करण्याऐवजी रामकुंडात पाणी प्रवाहित होण्यासाठी अन्य पर्यायांचा पालिका प्रशासनाने गांभीयाने विचार केला पाहिजे. अहिल्याबाई होळकर पुलापलीकडील बाजूचे नदीपात्रातील पाणी रामकुंडात प्रवाहित होण्यासाठी नादुरुस्त दरवाजे, नदीपात्राची स्वच्छता आदी कामे प्राधान्याने केली पाहिजे. - देवांग जानी, गोदाप्रेमी

परिसरात राेगराई पसरण्याची शक्यता
रामकुंडात टँकरद्वारे पाणी भरण्यात आले आहे. मात्र, पाणी प्रवाहित होण्यासाठी पर्यायच नसल्याने हे पाणी प्रदूषित झाले आहे. परिणामी, दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचीच अधिक शक्यता निर्माण झाली आहे.

अस्वच्छतेचा प्रश्न ठरताेय गंभीर
रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून, अारोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूून याकडे दुर्लक्षच करण्यात येत आहे. गोदापात्रातील निर्माल्य, कचरा गोळा करण्याचे काम लहान मुले करत असताना, मात्र अारोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून काणाडाेळा केला जात आहे.

भाविकांकडून विचारणा
रामकुंडावरधार्मिक कार्यासाठी येणाऱ्या भाविकांकडून रामकुंडाच्या झालेल्या अवस्थेबाबत विचारणा करण्यात येते. रामकुंडातील दूषित पाण्यामुळे भाविक गोमुखातून पडणाऱ्या पाण्यावरच धार्मिक कार्य, स्नान करत आहेत. या प्रकाराकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. - सतीश शुक्ल, अध्यक्ष,पुरोहित संघ

काेरडेठाक पडलेल्या रामकुंडात पालिकेने टँकरने पाणी भरले, परंतु प्रशासनाकडून दुर्लक्ष हाेत असल्याने हे पाणी दुर्गंधीयुक्त हाेत अाहे.