आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: सेनेच्या अपयशाची अाता अंतर्गत चाैकशी, या बेबनाव प्रकरणाची हाेणार पाेलखाेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मतदानाच्या पूर्वी नाशिकमधून सर्वाधिक उमेदवार निवडून येणारा पक्ष हा शिवसेना असा अंदाज असे विविध पातळ्यांवरून व्यक्त केले जात हाेते. मतदानानंतर हा अंदाज फाेल ठरत भाजपचे सर्वाधिक म्हणजे ६६ उमेदवार तर शिवसेनेचे केवळ ३५ उमेदवार निवडून अाले. महत्त्वाचे म्हणजे सेनेच्या ५१ उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालीत. त्यामुळे पक्षाच्या स्थानिक लाेकाधिकार समितीकडून अाता या अपयशाची कारणे शाेधली जाण्याची दाट शक्यता असून, तशा हालचालीही सुरू झाल्या अाहेत. अंतर्गत बेबनाव, नेतेमंडळींचे पुत्रप्रेम, एबी फाॅर्म वेळेवर पाेहाेचणे अाणि उमेदवारी अर्ज वितरीत करताना झालेला गाेंधळ या सर्वांचीच चाैकशी अाता या समितीकडून हाेण्याची शक्यता अाहे. 
 
गेल्या पंचवार्षिक काळात शिवसेनेचे १९ उमेदवार विजयी झाले हाेते. यंदा मात्र पक्षाने ३५ उमेदवारांपर्यंत मजल मारली असली, तरीही पक्षासाठी तयार झालेल्या पाेषक वातावरणाच्या तुलनेत निवडून अालेल्यांचे प्रमाण अल्प अाहे. त्यामुळे अाता पाच वर्षे सेनेला महापालिकेच्या सत्तेपासून दूर रहावे लागणार अाहे. अपेक्षेपेक्षा कमी नगरसेवक निवडून अाल्याने याला जबाबदार काेण याची पक्षीय पातळीवर चाैकशी हाेणार अाहे. शिवसेनेत अशा चाैकशीसाठी स्वतंत्र स्थानिक लाेकाधिकार समिती कार्यरत अाहे. ही समिती येत्या काही दिवसांत नाशिकमध्ये येऊन अपयशाची कारणमीमांसा करण्याची शक्यता अाहे. समितीचा अहवाल पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्यावर संबंधित दाेषींवर कारवाईदेखील हाेऊ शकते. 
 
- उमेदवारी मिळण्याच्या मुद्यावरून विनायक पांडे यांच्या समर्थकांनी एसएसके हाॅटेलमध्ये सेनेच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. या गाेंधळात पक्षाने निश्चित केलेल्या उमेदवारांपर्यंत एबी फाॅर्म पाेहाेचले नाही. त्यामुळे संबंधितांना पुरस्कृत म्हणून उमेदवारी करावी लागली. 
- प्रभाग क्रमांक मधील सेनेच्या अधिकृत उमेदवारांना मिळालेले एबी फाॅर्म तिकीट नाकारलेल्या सतनाम राजपूत अाणि त्यांच्या समर्थकांनी पळवत ते चक्क फाडून टाकले. त्यामुळे भगवान भाेगे, सविता बिडवे, प्रतिभा घाेलप, वर्षा गिते या चौघांनाही वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता अाले नाही. त्यानंतर सेनेने या चाैघांना पुरस्कृत केले खरे; पण चौघांनाही पराभवाचा फटका बसला. 
- प्रभाग क्रमांक १३ मधून विनायक खैरे यांची मुलगी एकता, अॅड. यतिन वाघ अाणि विनायक पांडे यांची उमेदवारी निश्चित हाेती. परंतु, एकता यांनी एेनवेळी निवडणुकीचे मैदान साेडले. दुसरीकडे विनायक पांडे यांनी उमेदवारी यादी जाहीर हाेण्याच्या दिवशीच स्वत:एेवजी अापल्या मुलाला उमेदवारी देण्याचा अाग्रह धरला. इतकेच नाही तर त्यांनी उमेदवारी करण्यासही नकार दिल्याने प्रभाग १३ मधील पॅनल खिळखिळे झाले. निवडणुकीच्या ताेंडावर पांडे अाणि खैरे यांनी उमेदवारी करण्यास नकार का दिला? 
- खासदार हेमंत गाेडसे यांनी एकलहरे गटातून कट्टर शिवसैनिक शंकर धनवटे यांना डावलून अापल्या मुलास उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसैनिकांत नाराजी निर्माण झाली. या गटातून गाेडसेंचा मुलगा पराभूत हाेऊन धनवटे विजयी झाले. महापालिका अाणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रमुख प्रचारकाची भूमिका खासदार गाेडसे यांनी वठविणे गरजेचे असताना ते केवळ अापल्या मुलाच्या निवडणुकीत अडकून बसले. त्याचा फटका पक्षाला बसला का? 
- संपर्कप्रमुख अजय चाैधरी यांचे पुतळे काही महिन्यांपूर्वी जाळणाऱ्यांनाही उमेदवारी देण्याचा प्रयत्न झाला. संबंधित उमेदवारी काेणाच्या प्रयत्नाने देण्यात अाल्यात? 
- शहरात केवळ प्रभाग क्रमांक मध्येच शिवसेनेचे संपूर्ण पॅनल विजयी झाले. म्हणजेच अन्यत्र शिवसेनेच्या माेठ्या नेत्यांनी नवख्या उमेदवारांचा प्रचार केला नाही का? 
- अन्य पक्षांतून सेनेत अालेल्या दहा उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. या उमेदवारांमध्ये निवडून येण्याची पात्रता नव्हती का? की या उमेदवारांना पाडण्यासाठी अंतर्गत शक्ती कार्यरत हाेती? 
- प्रभाग २९ मध्ये नगरसेवक अरविंद शेळके माजी नगरसेवक सतीश खैरनार तसेच नगरसेविका रत्नमाला राणे, सुमन साेनवणे, दीपक बडगुजर, भूषण देवरे या सहा उमेदवारांना एबी फाॅर्मचे वितरण करण्यात अाले हाेते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राणे, साेनवणे, बडगुजर अाणि देवरे यांचे अर्ज वैध ठरविले. त्यामुळे शेळके खैरनार यांचे अर्ज बाद ठरले. परंतु, खासदार अनिल देसाई यांच्या शिष्टाईनंतर बडगुजर अाणि देवरे यांनी माघार घेत शेळके खैरनार यांना पुढची चाल दिली. मात्र, या दाेघांचेही अर्ज बाद झाल्याने त्यांना शिवसेनापुरस्कृत अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. यात दाेघाही उमेदवारांचा पराभव झाला. बडगुजर यांचे निकटवर्तीय असलेल्यांकडे अतिरिक्त एबी फाॅर्म अाले काेठून? पक्षाने निश्चित केलेल्या उमेदवारांना डावलून त्यांनी त्यांच्या मर्जीतील उमेदवारांना एबी फाॅर्म दिले कसे? 
-प्रभाग क्रमांक १६ मध्ये विजयी झालेले दाेन उमेदवार काही दिवसांपूर्वी शिवसेनेत येण्यास तयार हाेते. मात्र, माजी मंत्री बबन घाेलप यांनी हा प्रतिष्ठेचा विषय करून संबंधितांना उमेदवारी दिल्यास अापण अापल्या पदाचा राजीनामा देऊ, असा इशारा दिला. त्यामुळे या प्रभागात शिवसेनेला खातेही खाेलता अाले नाही. या पराभवाची नैतिक जबाबदारी घाेलप घेणार का? 
बातम्या आणखी आहेत...