आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी दुसऱ्या फेरीत नाशिकचा सहभाग धूसर,अाॅगस्टची यादी लांबणीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- लाेकसहभाग उत्पन्नाची ठाेस हमी दिल्यामुळे केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी याेजनेच्या पहिल्या फेरीतून बाद झालेल्या नाशिकची दुसऱ्या फेरीतील समावेशाची शक्यता धूसरच अाहे. येत्या दहा दिवसांत दुसरी फेरी जाहीर हाेण्याची शक्यता असून, अागामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे नागपूर महापालिकेची वर्णी लागण्याची शक्यता असून, राज्यपातळीवरील काेटाही उत्तर प्रदेश पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमी हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे.

भाजपची केंद्रात सत्ता अाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शंभर स्मार्ट शहरे करण्याचे स्वप्न असल्याचे जाहीर केले हाेते. शहरांचा विस्तार, लाेेकसंख्या उत्पन्नाचे स्रोेत लक्षात घेऊन हजार काेटींपर्यंत कशी मदत मिळवून देता येईल, असाही प्रयत्न हाेता. या याेजनेत केंद्राचा निधी मिळवण्यासाठी माेठ्या स्पर्धांचा सामना करून गुणात्मक पद्धतीने निवड केलेल्या महापालिकांच्या निवडीचे निकषही जाहीर झाले. प्रामुख्याने शहराचा सूत्रबद्ध विकास करताना विशिष्ट भाग निवडून स्मार्ट टाऊनशिप करणे, हरित क्षेत्रात नवीन छाेटेखानी वसाहत निर्माण करणे, गावठाण पुनर्विकास, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अाराेग्य व्यवस्था, रिव्हर डेव्हलपमेंट अशा विविध अंगांनी स्मार्ट सिटीसाठी महापालिकेकडून तयारी करून घेतली. या याेजनेत लाेकसहभाग महत्त्वाचा निकष हाेता. गेल्या वर्षी जेव्हा पहिल्या फेरीत २० शहरांची निवड हाेणार हाेती, त्यावेळी महाराष्ट्रातील दहा शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक लागला हाेता. त्यानंतर पालिकेने जाेरदार तयारीही केली, मात्र लाेकसहभाग उत्पन्नाचे स्रोत मजबुतीकरणात अपयश अाल्यामुळे नाशिकचा पत्ता साफ झाला. त्याएेवजी साेलापूर पुणे महापालिकेची निवड झाली. दुसऱ्या टप्प्यात मात्र नाशिकची वर्णी लागण्यासाठी पालिकेने कसून तयारी केली. त्यासाठी केंद्र शासनाच्या शहर विकास खात्याकडे जाऊन मागील चुका काेणत्या हे जाणून सुधारित प्रस्तावही केला. अाता दुसऱ्या फेरीची यादी येत्या अाठ ते दहा दिवसांत जाहीर हाेण्याची शक्यता अाहे. मात्र, त्यात नाशिकचा समावेश अनिश्चितच मानला जाताे. केंद्र शासनाने गुणात्मक पद्धतीने स्मार्ट सिटीसाठी शहरे निवडण्याचा दावा केला असला तरी महाराष्ट्रात दहा माेठ्या महापालिकांची निवडणूक अाहे. त्यात मुंबई, ठाणे, नागपूर त्यानंतर नाशिकचा समावेश अाहे. स्मार्ट सिटीची मात्रा मुंबईला लागू हाेणार नसल्यामुळे ठाणे नागपूरचा यंदा क्रमांक लागेल, असे बाेलले जाते. त्यात नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हाेमटाऊन असल्यामुळे त्यांना झुकतेमाप मिळण्याची शक्यता अाहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात यंदा दाेनएेवजी अधिक शहरांची निवड हाेण्याबाबतही संदिग्धता अाहे. त्याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेश पंजाब विधानसभा निवडणुका असून, या पार्श्वभूमीवर येथील जास्तीत जास्त शहरे स्मार्ट सिटीसाठी निवडली जातील, असाही कयास व्यक्त हाेत अाहे.

स्मार्ट सिटीसाठी प्रस्ताव दाखल केल्यानंतर दुसरी यादी अाॅगस्टमध्येच जाहीर हाेईल, अशी शक्यता हाेती. प्रत्यक्षात सप्टेंबर सुरू झाल्यावरही यादी जाहीर झालेली नाही. अागामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीचा इफेक्ट कायम राहील अशा पद्धतीने यादी लांबवण्याचे प्रयत्न हाेत असल्याचाही कयास अाहे.
बातम्या आणखी आहेत...