आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायाराम-गयारामांची व्हिपमुळे अडचण, असे आहे पक्षीय बलाबल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अायाराम-गयारामांचीसंख्या सगळ्याच पक्षांत वाढल्याने यंदाची प्रभाग समिती सभापतिपदाची निवडणूक चुरशीची हाेणार अाहे. मंगळवारी सातपूर, सिडकाे अाणि नाशिकराेडची, तर बुधवारी पश्चिम, पंचवटी अाणि पूर्व विभागाची निवडणूक हाेणार अाहे. सर्वच पक्षांनी अापल्या सदस्यांना व्हिप बजावले असून, व्हिप माेडणाऱ्या सदस्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे इशारे देण्यात अाले अाहेत. पक्षादेश डावलणाऱ्या दाेघा नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय नुकताच विभागीय अायुक्तांनी जाहीर केला अाहे. त्यामुळे मंगळवारी हाेणाऱ्या निवडणुका लक्षवेधी ठरणार अाहेत.

महापालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापतिपदासाठी १२ १३ एप्रिल राेजी िनवडणूक हाेणार अाहे. निवडणुकीसाठी अखेरचे वर्ष असल्यामुळे प्रभाग समिती सभापतिपदाच्या माध्यमातून क्षेत्रातील जास्तीत जास्त प्रभागांवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळणार अाहे. त्यामुळे हे महत्त्वाचे पद अापल्या पक्षाकडे राखण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू अाहेत. अर्थात या निवडणुकीत अन्य पक्षात जाणाऱ्यांची कसरत हाेणार अाहे. महापाैरपदाच्या निवडणुकीत पक्षाचा अादेश डावलून मनसेमधून बंडखाेरी करून सेनेत गेलेल्या नगरसेविका शाेभना शिंदे प्रभाग क्रमांक ३६ चे नगरसेवक नीलेश शेलार यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय विभागीय अायुक्तांनी घेतल्याने पक्षांतर केलेल्या अॅड. यतिन वाघ, रमेश धाेंगडे, अरविंद शेळके, सतीश साेनवणे, अर्चना थाेरात, वंदना शेवाळे, सुनीता माेटकरी, माधुरी जाधव, सचिन भाेर, रत्नमाला राणे, विनायक खैरे, नंदिनी जाधव, शाेभना निकम, दीपाली कुलकर्णी, कन्हैया साळवे, वैशाली भागवत या नगरसेवकांची अडचण झाली अाहे. या नगरसेवकांनी पक्षादेश डावलल्यास त्यांचे नगरसेवकपदही रद्द हाेऊ शकते. अागामी निवडणुकीच्या दृष्टीने नगरसेवकपद रद्द हाेणे हे धाेक्याचे ठरणार असल्याने संबंधित नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले अाहे.

सेना- भाजपमधील वितुष्ट गेले काेठे?
गेल्याकाही दिवसांपासून भाजप शिवसेना हे दाेन्ही पक्ष एकमेकांविराेधात दंड थाेपटून उभे अाहेत. भाजपने प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेला अनुल्लेखाने मारा, असा कानमंत्र स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याने सेनेच्या नेत्यांच्या जिव्हारी लागले अाहे. दुसरीकडे सेनेच्या अांदाेलनांमुळे भाजपनेही अाता पालिका निवडणुकीत सेने विराेधात चाल करण्याच्या हालचाली सुरू केल्या अाहेत. या पार्श्वभूमीवर प्रभाग सभापतिपदाची निवडणूक हाेत अाहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना-भाजप हे एकमेकांचे विराेधक असल्याचे भासविले जात असले तरीही प्रभाग समिती सभापतिपदासाठी युती करण्याच्याही हालचाली सुरु अाहेत. विशेषत: नाशिकराेड, सातपूर, सिडकाे अाणि पश्चिम विभागात युतीसंदर्भातील भूमिका महत्त्वाची ठरणार अाहे. त्यामुळे या पक्षांची नेमकी राजकीय भूमिका काेणती, असाही प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडत अाहे.

सातपूरमध्येकाळेंना जाधव यांचे अाव्हान
सातपूरप्रभाग समिती निवडणुकीत मनसेच्या सविता काळे, राष्ट्रवादीच्या उषा अाहेर माकपच्या तिकिटावर निवडून अालेल्या नंदिनी जाधव यांनी अर्ज भरले अाहेत. या विभागात मनसेचे सर्वाधिक सहा सदस्य अाहेत. त्यामुळे काळेंचे पारडे जड दिसत असताना, माकपमधून सेनेत प्रवेशित झालेल्या नंदिनी जाधव यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी केल्याने चुरस वाढली अाहे. या प्रभागात सेनेचे एक, भाजपचे एक, रिपाइंचे एक असे तीन सदस्य युतीत अाहेत. याशिवाय, जाधव यांच्यासह सचिन भाेर या दाेन माकपच्या सदस्यांनी पक्ष साेडून अनुक्रमे सेना भाजपात प्रवेश केला अाहे. त्यामुळे पाच नगरसेवक नंदिनी जाधव यांना मतदान करू शकतात. लता पाटील या काँग्रेसमध्ये असल्या तरीही त्यांचे पती दिनकर पाटील भाजपात अाहेत. त्यामुळे पाटील काय भूमिका घेतात, यावर निवडणुकीचे समीकरण बदलू शकते. उषा अाहेर यांनी निवडणुकीची तयारी केली असली तरीही तूर्तास त्यांच्या गाेटात केवळ तीनच सदस्य असल्याचे दिसते.
शिंदे शेलार यांना करता येणार नाही मतदान
नाशिकराेडविभागातील शाेभना शिंदे नीलेश शेलार यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात अाले अाहे. त्यांनी या निर्णयाविराेधात उच्च न्यायालयात धाव घेतली असली, तरीही नगरसेवकपद रद्द करण्याच्या निर्णयास स्थगिती मिळाल्याचे पत्र दाखविल्याशिवाय त्यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. या निवडणुकीत चुरस वाढल्याचे चित्र असून, त्यातच दाेन नगरसेविकांना मतदान करता येणार नसल्याने या घडामाेडी लक्षवेधक ठरणार अाहेत.
पुढीस स्लाइड्सवर जाणून घ्या, पक्षीय बलाबल आणि निवडणूक कार्यक्रम....