आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक- सातपूरला महिलांचा दारू दुकान बंद पाडण्याचा पुन्हा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांचा राैद्रावतार,पाेलिस बंदाेबस्तात दुकान सुरू - Divya Marathi
महिलांचा राैद्रावतार,पाेलिस बंदाेबस्तात दुकान सुरू
सातपूर- सर्वाेच्च न्यायालयाच्या अादेशामुळे महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर असलेली दारू दुकाने बंद करण्यात अाली अाहेत. न्यायालयाच्या अादेशामुळे सातपूर गावातील देशी-विदेशी मद्य विक्री करणारी तीन देशी दारूची विक्री करणाऱ्या चार दुकानांसह पाच बिअर बार असे एकूण बारा दुकाने बंद करण्यात अाली अाहेत. त्यामुळे अशाेकनगर भागात असलेल्या नाशिक ब्रॅण्डी या एकमेव देशी-विदेशी दारूच्या दुकानावर ग्राहकांच्या रांगा लागत असल्यामुळे या दुकानाच्या परिसरात राहणाऱ्या महिलांना माेठ्या प्रमाणात त्रास हाेत अाहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी रात्री बंद पाडलेले दारूचे दुकान रविवारीही बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुकानाला परवाना असल्याने सध्या पाेलिस बंदाेबस्तात दुकान सुरू असून गुरुवारी या संदर्भात स्थानिक लाेकप्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिकांची बैठक अायाेजित करण्यात अाली अाहे. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय राज्य महामार्गापासून पाचशे मीटरच्या आत असलेली सर्व दारू दुकाने बिअर बार बंद करण्यात आले आहेत. महामार्गापासून पाचशे मीटरपेक्षा दूर असलेल्या सातपूरमधील नाशिक ब्रॅण्डी या एकमेव वाइन शाॅपवर दारू खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रेशन दुकानावरील रांगेप्रमाणे रांग लागत अाहे.
 
या दुकानात येणाऱ्या मद्यपींचा स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तीन वर्षांपासून दुकानाशेजारील नागरिकांना मद्यपींचा त्रास सहन करावा लागत असल्याने इतर दुकानांप्रमाणेच हे दुकान बंद करावे या मागणीसाठी महिलांनी पुढाकार घेतला अाहे. 

गेल्या काही दिवसांपासून या इमारतीच्या अावारातील मोकळ्या जागेत मद्यपींचा मद्य प्राशन करून धिंगाणा सुरू असताे. रात्रीच्यावेळी परिसरात शतपावली करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना याचा विशेष त्रास होत आहे. महिलांची छेड काढणे, रस्त्यावरून धूमस्टाइलने जोरात हॉर्न वाजवत गाडी चालवणे, रस्त्याच्या कडेलाच दारू पिण्यास बसणे, मद्यपींमध्ये जोरजोरात भांडण होणे आदी प्रकार नित्याचेच झाले आहेत. या दुकानापासून शंभर मीटर अंतरावर शाळा खासगी क्लासेस आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींनाही या मद्यपींच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
 
दरम्यान, येथील मद्यपींचा त्रास असह्य झाल्याने शनिवारी रात्री परिसरातील रणरागिणींनी दुकान बंद करण्याचा आग्रह मालकाकडे धरला. महिलांचा संताप आक्रमक पवित्रा बघून मालकाने दुकान बंद करण्यात धन्यता मानली हाेती. मात्र, दुसऱ्या दिवशीही दुकान पूर्ववत सुरू राहिल्याने महिलांच्या संतापाचा पारा अनावर झाल्याने शेकडो महिलांनी थेट दुकानावर चाल करत दुकान बंद करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण पसरले. 
 
सातपूर पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी नगरसेवक सुदाम नागरे, विक्रम नागरे, गणेश बोलकर, स्वप्नील पाटील, नंदू जाधव अादींनी घटनास्थळी धाव घेतली. यासंदर्भात गुरुवारी बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिला माघारी फिरल्या. या अांदाेलनात सुवर्णा निकम, लता मोरे, शकुंतला गायकवाड, अश्विनी उगले, सविता लभडे, मोहिनी कुलकर्णी, किरण जगताप, रहिमत शेख, उमा उपाध्याय, मनीषा टेमगिरे आदी महिला सहभागी झाल्या हाेत्या. 
 
..तर दुर्घटनेला नगरसेवकच जबाबदार 
-या दुकानामुळे परिसरातील महिला वर्गाला मोठा त्रास होत आहे. प्रभागातील चारही नगरसेवक सत्ताधारी पक्षाचे आहेत. प्रभागातील नागरिकांना विशेषत: महिलांना होणारा त्रास भविष्यातील अडचण लक्षात घेता या चारही नगरसेवकांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. भविष्यात या कारणामुळे एखादी दुर्घटना घडल्यास याला नगरसेवकच जबाबदार राहतील. -शांताराम कुटे, सामाजिक कार्यकर्ते 
 
मुलींचे शिक्षण बंद करण्याची वेळ 
-अामच्या येथील मुली शाळा, कॉलेज तसेच खासगी क्लासला ये-जा करतात. अनेकदा मद्यपींकडून त्यांची छेड काढली जाते. पंधरा दिवसांपूर्वी एका मुलीची ओढणी खेचण्याइतपत एका मद्यपीची मजल गेली होती. त्यामुळे मुलींना शाळेत पाठवणे जिकिरीचे झाले आहे. -शकुंतला गायकवाड, स्थानिक रहिवासी 
 
करारात परवानगी नाही 
दुकानमालक बिल्डिंग मालक यांच्यात झालेल्या करारात मद्य विक्री करण्याचा स्पष्ट उल्लेख असतानाही या ठिकाणी मद्यविक्री होत असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 
अशाेकनगर येथील नाशिक ब्रॅण्डी हे दुकान बंद करण्यासाठी सरसावलेल्या महिला. मात्र परवाना असल्याने हे दुकान पाेलिस बंदाेबस्तात सुरू करण्यात अाले. 
बातम्या आणखी आहेत...