आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्त विद्यापीठाचे विशाखा पुरस्कार जाहीर, विशेष समारंभात रविवारी सहा वाजता होणार वितरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या विशाखा काव्यसंग्रहाच्या नावाने काव्यलेखनासाठी राज्यस्तरीय विशाखा काव्यलेखन पुरस्कारांची घोषणा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी केली.
 
विद्यापीठातर्फे रविवारी (दि. २६) सायंकाळी ६ वाजता मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कालिदास कलामंदिरात होणाऱ्या विशेष समारंभात ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर असतील.   
 
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या विशाखा काव्यसंग्रहाच्या नावाने काव्यलेखनासाठी विशाखा काव्यलेखन पुरस्कार दिला जातो. २०१६ च्या पुरस्कारासाठी डॉ. योगिनी सातारकर-पांडे (नांदेड) यांच्या ‘जाणिवांचे हिरवे कोंभ’ या काव्यसंग्रहास  २१ हजारांचा प्रथम पुरस्कार, मोहन कुंभार (सिंधुदुर्ग) यांच्या ‘जगण्याची गाथा’ काव्यसंग्रहास द्वितीय क्रमांकाचा १५ हजारांचा पुरस्कार, तर विष्णू थोरे (नाशिक) यांच्या ‘धुळपेरा उसवता’ काव्यसंग्रहास तृतीय क्रमांकाचा १० हजारांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.   
 
‘बोलू कवतिके’ आज राज्य शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मुक्त विद्यापीठाच्या वतीने रविवारी (दि. २६) सुरभी, पुणे निर्मित ‘बोलू कवतिके’ सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 
या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक रवींद्र साठे, अनुराधा मराठे, योगिता गोडबोले, श्रीरंग भावे, अशोक काळे यांसारखे दिग्गज येणार असून प्राजक्ता राज (अत्रे) नृत्ये सादर करतील. केदार परांजपे यांचे संगीत संयोजन असून तुषार दळवी, मधुरा वेलणकर, प्रवीण जोशी अभिवाचन करणार असल्याचे सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...