आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मध्वजा फडकती, वैष्णव मेळा गोदातटी, ध्वजारोहणाने साधू-महंतांच्या कुंभास आरंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- प्रात:कालचेमंगल स्वर, मंत्रघोषात सुरू असलेले स्वस्ती पुण्याहवाचन, दुसरीकडे बॅण्डच्या तालात अस्त्र-शस्त्रांचे खेळ, साधू-महंतांच्या प्रसन्न मूर्ती, आपल्यापेक्षा पदाने मोठ्या महंतांपुढे नतमस्तक होत आपल्या धर्मपर्वाला होणाऱ्या प्रारंभाचे उमटणारे वैष्णवांच्या मुखावरील समाधान... अशा भारलेल्या भुईशी जोडलेली धर्मध्वजा आकाशात दिमाखाने फडकली, तेव्हा ‘सियावर रामचंद्र की जय’चा एकच गजर झाला आणि जणू सर्व वैष्णवांनी नाचत देवतांकडे प्रार्थना केली.

साधू-महंतांच्या कुंभपर्वाला बुधवारी (दि. १९) अाखाड्यांमध्ये धर्मध्वजा फडकवून अारंभ झाला. त्यानंतर आखाड्यांच्या खालशांमध्येही ध्वजा फडकवून भजन-पूजन, गुरुमंत्र, अन्नछत्र, दानधर्म अशा विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. नाशिकमधील दिगंबर, निर्वाणी अाणि निर्मोही या तिन्ही अनी अाखाड्यांमध्ये प्रात:समयी विधिवत पूजनाने धर्मध्वजा फडकली आणि देवदेवतांची स्थापना करण्यात आली. मान्यवरांचे आगमन होताच आतषबाजी, बॅण्डची सलामी, ढोल-ताशांचा गजर झाला.

साहेबांचीआठवण... :
सोहळ्यातराज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी आपल्या भाषणात एवढ्या दिमाखदार सोहळ्यात खरी कमतरता भासते ती आज बाळासाहेबांची.. असे उच्चारताच अनेकांनी त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली. बसलेल्यांमध्ये ‘अाज बाळासाहेब असते तर या साेहळ्याला नक्कीच उपस्थित राहिले असते,’ अशी चर्चाही झाली. तर, ठाकरे कुटुंबीयांपैकी या कार्यक्रमाला कोणीच नसल्याने त्याबद्दलही कुजबूज होत होती.

मुख्यमंत्रीठंडे आवाज में कहेंगे...
नाशिकलाआणखी निधी मिळावा, ही मागणी प्रारंभीच महापौरांनी केली. त्यानंतर माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही कुंभमेळ्यासंदर्भात आपण यापूर्वीच बरेच काम केल्याचे अधोरेखित करत कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून आणखी निधी मिळावा यासाठी शहांनीच मोदींकडे शब्द टाकावा हे बोलतानाच ‘मुख्यमंत्री बोलेंगे लेकिन वो ठंडे आवाज में कहेंगे... आपका शब्द कोई टाल नहीं सकता,’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
आखाड्यांच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत निर्माण झालेला अध्यात्मानंद साधकांनी केलेल्या शंखध्वनीने टिपेला पोहोचला. डौलाने फडकणाऱ्या धर्मध्वजानेही लक्ष वेधून घेतले.
...................
बख्खळ सत्कारांनी आणला कंटाळा
कार्यक्रमखरेतर प्रवेशद्वाराच्या उद‌्घाटन सोहळ्याचा, पण तब्बल ४०-४५ जणांच्या सत्कारांमुळे उपस्थित चांगलेच कंटाळले हाेते. सगळ्यांना ऐकायची होती ती अमित शहा, मुख्यमंत्री अाणि इतर मान्यवरांची भाषणे. पण, मान्यवरांच्या आगे-मागे मिरवून सत्कार करवून घेण्यातच धन्यता मानली जात होती. अनेकांना प्रश्न पडला की, हे कशासाठी? तर १४ जुलै रोजी रामकुंड येथे झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी पसरली होती.

पाऊले चालती साधुग्रामची वाट...
धर्मध्वजाराेहणसाेहळा तसा अाखाड्यांचा. मुख्य कार्यक्रम हाेता ताे जगद‌्गुरू श्री रामानंदाचार्य प्रवेशद्वार उद‌्घाटन साेहळ्याचा. या कार्यक्रमासाठी सकाळी-सकाळी नाशिककरांची पावले साधुग्रामकडे वळली हाेती. स्वामीनारायण पाेलिस चाैकी, पंचवटीतील अमरधाम रस्ता, जुना शाही मार्ग हे तपाेवनात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात अाल्याने भाविकांनी जागा मिळेल तिथे गाड्या उभ्या करून तीन-तीन, चार-चार किलाेमीटर पायी चालत साेहळास्थळ गाठले.

भक्तिगीतांतून झाली तल्लीनता...
साेहळास्थळीखास भक्तिगीतांची पर्वणीच हाेती. पं. भीमसेन जाेशी यांचे शिष्य पं. उपेंद्र भट यांच्या स्वरांनी वातावरणात देवरूप निर्माण झालेे. त्यांचा खडा अावाज, घेतलेल्या ताना अालापींनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले हाेते. त्यांना साथ केली ती नाशिकच्या गायिका मीना परूळकर-निकम यांनी, तर तबल्यावर नितीन वारे, संवादिनीवर सुभाष दसककर, मृदंगावर दिगंबर साेनवणे तालवाद्यावर अमित भालेराव यांनी साथसंगत केली. अनुराधा मटकरी जयंत ठाेंबरे यांनी सूत्रसंचालन केले.