आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील शहरे लठ्ठ महिला-पुरुषांचे माहेरघर!, राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात अनेक प्रचलित गृहीतकांपेक्षा वेगळे निष्कर्ष समोर येत आहेत. महाराष्ट्रात मात्र जास्त वजनाच्या स्त्रियांबाबत  प्रचलित गृहीतक २०१६ मध्येही कायम आहे.
 
जास्त वजनाच्या स्त्रियांचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी स्त्रियांमध्ये अधिक आहे. शहरी भागातील पुरुषांचे वजनही चांगलेच वाढलेले आहे. त्या तुलनेत शारीरिक वजनाच्या बाबतीत ग्रामीण भागातील स्त्री-पुरुष काहीसे हलके असल्याचे दिसून आले आहे. एक एप्रिल २०१५ ते २५ सप्टेंबर २०१५ या काळात देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रकाशित केला आहे.  
 
पुढील स्लाईडवर वाचा, अकोला, औरंगाबाद, नाशिक, सोलापुरात अधिक , शहरी भागांतील लठ्ठ स्त्रियांची संख्या दुप्पट... 
बातम्या आणखी आहेत...