आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम परवानगी अाता फास्ट ट्रॅकवर, विशेष सेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राष्ट्रीय हरित लवादाने शहरातील बांधकाम परवानगीवरील निर्बंध उठवल्यानंतर अाता वर्षभरापासून रखडलेली प्रकरणे मार्गी लावण्यासाठी अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी नगररचना विभागाचा कारभार फास्ट ट्रॅकवर अाणला अाहे. बांधकाम परवानगी, पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी त्यांनी नगररचना विभागात विशेष सेल उघडण्याचे अादेश दिले अाहेत.
नाेव्हेंबर २०१५ मध्ये खत प्रकल्पाचे कामकाज बंद असल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने शहरातील बांधकाम परवानगी पूर्णत्वाच्या दाखल्यावर बंदी घातली. परिणामी, शहरातील रिअल इस्टेट तर ठप्प झालेच, मात्र सर्वसामान्यांची घरबांधणी अडचणीत सापडली. हरित लवादाने खत प्रकल्प सुरू केल्यास निर्बंध उठवण्याचे संकेत दिले हाेते, मात्र महापालिकेच्या तत्कालीन मुखंडांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, हरित लवादाने महापालिकेचा पाठपुरावा लक्षात घेत अटी-शर्तींद्वारे बांधकाम परवानगीला हाेकार दर्शवला, मात्र या अटी-शर्ती छाेट्या प्रकल्पांसाठी पूरक नव्हत्या. दरम्यान, अायुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यावर अभिषेक कृष्णा यांनी खत प्रकल्प सुरू करण्यास प्राधान्य दिले. खत प्रकल्प सुरू केल्याचे हरित लवादाला दाखवल्यानंतर त्यांनी शहराची अडवणूक करण्याचा हेतू नसल्याचा निर्वाळा देत बांधकाम परवानगीला हिरवा कंदील दाखवला. दरम्यान, वर्षभरापासून शहरातील अनेक लहान-माेठी बांधकामे अडकून पडली अाहेत. याबराेबरच अनेक इमारती पूर्ण असून, पूर्णत्वाचा दाखला नसल्यामुळे ग्राहकांना ताबा देता अालेला नाही. ताबा नसल्यामुळे कर्जाचे हप्ते जुन्या घराचे भाडे असा काेंडमारा सुरू अाहे. ही बाब लक्षात घेत अायुक्तांनी नगररचना विभागाला अाता बांधकामाशी संबंधित कामकाज फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या अाहेत.
हरित लवादासाठी पाठपुरावा केल्याबद्दल अायुक्त कृष्णा यांचे क्रेडाईसह बांधकाम क्षेत्राशी संबंधित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अाभार मानले. त्याबराेबरच लवकरच राज्यात बांधकाम व्यवसायासाठी ‘रेरा’चे (रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी) नियम लागू होणार असल्याचे लक्षात घेत रखडलेले कामकाज फास्ट ट्रॅकवर पूर्ण करावे, अशी विनंती केली. त्यानुसार अायुक्तांनी तातडीने त्या पद्धतीने कामाच्या सूचना यापूर्वीच केल्याचे स्पष्ट केले. यावेळी सुनील कोतवाल, कुणाल पाटील, उमेश वानखेडे, अनिल आहेर, रसिक बोथरा, रवी महाजन, प्रदीप काळे, विजय सानप, सचिन गुळवे, उदय घुगे, हेमंत पारख, सचिन बागड, शंतनू देशपांडे, समीर सोनवणे, सुनील गवांदे अादी पदाधिकारी उपस्थित हाेते.

हरित लवादासाठी पाठपुरावा केल्याबद्दल महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांचे क्रेडाईसह बांधकाम क्षेत्राशी संबंधित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत अाभार मानले.
५००बांधकाम परवानग्या अडचणीतच : हरितलवादाने बांधकाम परवानगी पूर्णत्वाच्या दाखल्यावरील निर्बंध उठवले असले तरी नाेव्हेंबर २०१५ नंतर हरित लवादाने घातलेल्या तीन अटी-शर्तींअाधारे ज्या गरजूंनी बांधकाम परवानगी घेतली त्यांचे पुढे काय हाेणार, हा प्रश्न कायम अाहे. या गरजूंत प्रामुख्याने सर्वसामान्य नाशिककरांची संख्या अधिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. हरित लवादाच्या अटीनुसार अभिन्यासात प्रतिकुटुंब (एका कुटुंबात साधारण सदस्य) एका व्यक्तीमागे याप्रमाणे २५ वृक्ष किमान लावणे अपेक्षित अाहे. अाता १०० वाराचा प्लाॅट असेल तर २५ वृक्षांसाठी माेठ्या प्रमाणात जागा लागेल. एवढेच नव्हे तर मलजलशुद्धीकरण केंद्र जैविक घनकचरा विल्हेवाटीसाठी यंत्रणा यांच्यासाठी जागेचा विचार केला तर निम्मे क्षेत्र बांधकामासाठी उपलब्ध हाेते की नाही, ही चिंताच हाेती. मात्र, गरज म्हणून अशा पद्धतीने काही विकसकांनी परवानगी घेतली असून, अाता हरित लवादाचे निर्बंध उठल्यानंतर या सर्वांना कसा दिलासा द्यायचा, याचा विचार अायुक्त अभिषेक कृष्णा करीत अाहेत. सूत्रांच्या मते, हरित लवादाच्या निर्णयाची प्रत प्राप्त झाल्यानंतर त्यातील अादेश बघून पुढील भूमिका ठरवली जाणार अाहे.
हरित लवादासाठी पाठपुरावा केल्याबद्दल अायुक्त कृष्णा यांचे क्रेडाईसह बांधकाम क्षेत्राशी संबंधित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अाभार मानले. त्याबराेबरच लवकरच राज्यात बांधकाम व्यवसायासाठी ‘रेरा’चे (रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी) नियम लागू होणार असल्याचे लक्षात घेत रखडलेले कामकाज फास्ट ट्रॅकवर पूर्ण करावे, अशी विनंती केली. त्यानुसार अायुक्तांनी तातडीने त्या पद्धतीने कामाच्या सूचना यापूर्वीच केल्याचे स्पष्ट केले. यावेळी सुनील कोतवाल, कुणाल पाटील, उमेश वानखेडे, अनिल आहेर, रसिक बोथरा, रवी महाजन, प्रदीप काळे, विजय सानप, सचिन गुळवे, उदय घुगे, हेमंत पारख, सचिन बागड, शंतनू देशपांडे, समीर सोनवणे, सुनील गवांदे अादी पदाधिकारी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...