आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात उद्यापासून 28 वी किशाेर-किशाेरी राष्ट्रीय खाे-खाे अजिंक्यपद स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक महानगरपालिका अाणि जिल्हा खाे-खाे असाेसिएशनच्या संयुक्त विद्यमाने २८ व्या राष्ट्रीय सबज्युनिअर खाे-खाे स्पर्धेचे अायाेजन नाशकात २४ ते २८ मे दरम्यान करण्यात अाले अाहे. ही स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे रंगणार असून, त्यात ३३ राज्यांचे ६० संघ सहभागी हाेणार असल्याची माहिती खाे-खाेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार देशमुख यांनी साेममवारी (दि. २२) पत्रकार परिषदेत दिली. 
 
नाशिकच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर या स्पर्धा रंगणार असून शुभारंभाच्या साेहळ्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन अाणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार अाहेत. यावेळी छत्रपती पुरस्कारप्राप्त संघटक अानंद खरे, उमेश अाटवणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित हाेते. 
 
भारतात प्रथमच डाेम खाे-खाे 
मेमहिन्यात हाेणाऱ्या स्पर्धेमुळे खेळाडूंना उन्हाचा तसेच अवकाळी स्पर्धेचा त्रास हाेऊ नये, याकरीता या स्पर्धेसाठी प्रथमच २१० फूट बाय ९० फुटाचा डाेम उभारण्यात अाला अाहे. या स्पर्धेमध्ये येणाऱ्या ८४० खेळाडू, ४० पंच अाणि १०० पदाधिकारी असे एकूण ९८० लाेकांची निवासाची अाणि भाेजनाची व्यवस्था संघटनेमार्फत करण्यात अाली अाहे. 
 
या सर्व व्यवस्थेसाठी महापाैर रंजना भानसी, स्थायीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, अामदार बाळासाहेब सानप यांचे सहकार्य लाभले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात अाले. 
 
विशेष डाेमची व्यवस्था 
काही तांत्रिक कारणांमुळे लांबत गेलेली स्पर्धा एेन मे महिन्यात हाेणार असल्याने अायाेजकांतर्फे शिवाजी स्टेडियमवर विशेष डाेमची व्यवस्था करण्यात अाली अाहे. सामने दरराेज सकाळी ते ९.३० अाणि सायंकाळी ते या वेळेत खेळवले जाणार असल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली. 
 
महाराष्ट्राचे संघ जाहीर; मुलांच्या संघात नाशिकच्या चंदू चावरेची निवड 
नाशिक -  २४ते २८ मे दरम्यान नाशिक येथे आयोजित या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी महाराष्ट्राच्या संघांची घोषणा राज्य असोसिएशनचे सचिव डाॅ. चंद्रजीत जाधव यांनी केली. या संघांमध्ये नाशिकमधील अलंगुणचा खाे-खाेपटू चंदू चावरे याचादेखील समावेश अाहे. 
 
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचे नेतृत्व पुणेकर सांभाळतील. किशाेर संघाचा कप्तान शुभम थोरात तर किशाेरी संघाचे कर्णधारपद साक्षी करे भुषवील. 
 
मुला-मुलींचे नेतृत्व पुण्याकडे : २८ व्याकिशाेर-किशाेरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणारे महाराष्ट्राचे संघ खालीलप्रमाणे... 
 
किशाेर संघ : शुभमथोरात (कर्णधार), साहिल चिखले, शुभम खळदकर (सर्व पुणे), सौरभ अहिर, नागेष चोरलेकर, गणेश जाधव (सर्व सांगली), धीरज भावे (मुंबई उपनगर), नरेंद्र कातकडे (अहमदनगर), चंदू चावरे (नाशिक), मनोज चैधरी (औरंगाबाद), आदित्य धिमधिमे (उस्मानाबाद), रामजी कश्यप (सोलापूर), प्रशिक्षक: आनंद पवार (धुळे), व्यवस्थापक : दीपक रावरे 
 
किशाेरी संघ : साक्षीकरे (कर्णधार), ऋृतिका राठोड, साक्षी वसावे (सर्व पुणे), ऋृतुजा सुराडकर , मयुरी पवार (सर्व औरंगाबाद), रितीका मगदूम (सांगली),वैभवी गायकवाड, गौरी शिंदे (सर्व उस्मानाबाद), साक्षी वाफेलकर (मुंबई उपनगर), साक्षी सरजीने (ठाणे), वैष्णवी पालवे (अहमदनगर), अश्विनी निशाद (पालघर), प्रशिक्षक: अविनाश करवंदे, व्यवस्थापिका: तेजस्विनी बाहेती. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...