आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंच्या त्यागामुळे राष्ट्रवादी-काँग्रेसची अाघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या माताेश्री राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका छाया ठाकरे यांच्या प्रभाग क्रमांक १२ मधील उमेदवारीवरून काँग्रेससाेबतची अाघाडी तुटत असल्याचे बघून अखेर सामंजस्याने ठाकरे यांनी माघार घेतली गेल्या चार दिवसांपासून तुटण्याच्या अवस्थेत असलेल्या अाघाडीचे सूत अखेर जुळले. दरम्यान, राष्ट्रवादीने विद्यमान नगरसेवकांसह ६१ उमेदवार दिले असून, काँग्रेसच्या दाेन नगरसेविका एेनवेळी राष्ट्रवादीत दाखल झाल्यामुळे अाघाडीत तूर्तास राष्ट्रवादीचे पारडे जड झाले अाहे. 
 
पाच दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अाघाडीचा घाेळ सुरू हाेता. या दाेघांत प्रभाग क्रमांक १२ मधील दाेन जागेवरून अडले हाेते. या ठिकाणी काँग्रेसने चारही जागा मागितल्या हाेत्या, तर राष्ट्रवादीने छाया ठाकरे उषा अहिरे या दाेन जागा विद्यमान नगरसेविकांच्या असल्याने दावा केला हाेता. मात्र, या जागांवरून काँग्रेसने अाघाडी तुटली तर चालेल, अशी भूमिका घेतली हाेती. राज्याचे विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी करून बघितली. काही काळाकरिता अाघाडी झाली यात ठाकरेंसाठी एक जागा साेडून उर्वरित तीन जागा काँग्रेसने घेतल्या, असेही सांगितले गेले. मात्र, माजी विराेधी पक्षनेत्या हेमलता पाटील यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील एका गटाने प्रतिष्ठा पणाला लावल्यावर अाघाडी धाेक्यात अाली. शुक्रवारी हा मुद्दा तुटेपर्यंत ताणला गेल्यावर अखेर शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी माताेश्रींची उमेदवारीच रद्द केली. त्यामुळे दाेन टर्मपासून नगरसेविका असलेल्या ठाकरे यांना यंदाच्या निवडणुकीत थांबावे लागले. राष्ट्रवादीच्या त्यागानंतर अाघाडीचे सूत जुळले. 

राष्ट्रवादीने साेडला सुटकेचा नि:श्वास 
राष्ट्रवादी कडून नऊ विद्यमान नगरसेवकांनी अर्ज भरले. विराेधी पक्षनेत्या कविता कर्डक, समाधान जाधव, सुनीता शिंदे, राजेंद्र महाले, सुफीयान जीन, शाेभा अावारे, वैशाली दाणी, सविता दलवानी, नीलिमा अामले या विद्यमान नगरसेविकांनी अर्ज दाखल केले. 

प्रभाग क्र. १३ मध्ये रंजना पवार यांच्याबाबत संभ्रम 
प्रभाग क्रमांक १३ मध्ये मनसेच्या सुरेखा भाेसले यांच्यासाेबत राष्ट्रवादी काँग्रेसने समझाेता केल्यामुळे विद्यमान नगरसेविका रंजना पवार या शिवसेनेत गेल्याची चर्चा हाेती, मात्र त्यांनी इन्कार करीत प्रभाग १३ प्रभाग १४ मधून अर्ज भरला अाहे, माघारीपर्यंत निर्णय घेईल असे स्पष्ट केले. 

राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका स्वबळावर 
प्रभाग क्रमांक मध्ये राष्ट्रवादीचे एकमेव चार सदस्यीय पॅनल अाहे. याव्यतिरिक्त प्रभाग क्रमांक १४ मध्ये सुफीयान जीन शाेभा संजय साबळे यांच्याबराेबर काँग्रेसच्या समीना मेमन बबलू हाजी पठाण यांनी राष्ट्रवादीचे अर्ज भरल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अाता काेणत्या पक्षाचा एबी फॉर्म वैध ठरताे यावर सर्व अवलंबून अाहे. मेमन पठाण यांचा राष्ट्रवादीचा एबी फॉर्म स्वीकृत झाल्यास या ठिकाणी संपूर्ण पॅनल याच पक्षाचा असेल. 
 
बातम्या आणखी आहेत...