आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेहाच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन, महापौर, उपमहापौरांनी घेतली ठाकरे कुटुंबीयांची भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- सिडकोतीलतानाजी चौक येथे गुरुवारी सकाळी घंटागाडीच्या चाकाखाली आल्याने ठार झालेल्या नेहा ठाकरे या शाळकरी मुलीच्या घरी जाऊन महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. परिसरात जमा झालेल्या नागरिकांनी घंटागाडी ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली.

गुरुवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप पसरली असून, घंटागाडीच्या अनेक तक्रारी नागरिकांनी मांडल्या आहेत. घंटागाडी हा विषयच मुळात वादाचा ठरला आहे. यापूर्वी अनेकवेळा तक्रारी केल्या, आंदोलने केली, निवेदने दिली. तरीही प्रशासन दुर्लक्ष करीत होते. मात्र नेहाच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि थेट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. मात्र ठेकेदार चेतन बोरावर कारवाई करण्यात आली नसल्याचे समजले आहे. त्यामुळे ठेकेदाराला पाठीशी घातले जाते की काय, असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. यावेळी उपमहापौर गुरुमित बग्गा, शिवाजी चुंभळे, कविता कर्डक, संजय चव्हाण, अनिल मटाले, रत्नमाला राणे, कल्पना चुंभळे आदी उपस्थित होते.

सर्वतोपरी सहकार्य
याघटनेची चौकशी केली जाईल. याबाबत जे दोषी आढळतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई होईलच. नेहाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी आम्ही सर्वताेपरी प्रयत्न करणार आहोत. अशोकमुर्तडक, महापौर.

प्रशासन जागेल का?
यामुलीची घटना पाहिल्यावर मन सुन्न झाले. एका निष्पाप जीवाचा बळी गेला. घंटागाडीच्या सर्व गैरप्रकाराला महापालिका प्रशासनच जबाबदार आहे. ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे. आता तरी प्रशासनाने गांभीर्य लक्षात घ्यावे. घंटागाड्याच काय, इतर अनेक घटकांकडे लक्ष देण्याची गरज आहे. वैभवदेवरे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक.