आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नेट’ नोटिफिकेशन नाही; परीक्षा मात्र वेळेवरच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  ‘सीबीएसई’तर्फेघेतली जाणारी नेट अर्थात ‘नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट’ ही या वर्षीदेखील जुलैमध्ये घेतली जाणार आहे. याबाबत कोणत्याही सूचना अद्याप आल्याने विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र, सीबीएसईच्या संकेतस्थळावर आता याबद्दल संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 
 
प्रारंभी या परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम झाला होता. नोटिफिकेशन आल्याने परीक्षा होणार किंवा नाही. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने याबाबत सूचना काढल्या आहेत की, ही परीक्षा जुलैमध्येच होईल. या परीक्षेबाबतच्या सूचना असणारे परिपत्रक साधारण एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात येणे अपेक्षित होते. मात्र, ते अद्यापही आले नसल्याने नेट परीक्षा होणार किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. दरवर्षी या परीक्षेसाठी साधारण लाख विद्यार्थी पात्र ठरत असतात. ही परीक्षा असिस्टंट प्रोफेसर, ज्युनिअर रिसर्च फेलोशिप पदांसाठी घेतली जाते. 

संपूर्ण वर्षभरातून विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले असतात. याबरोबरच परीक्षेच्या सूचना लांबण्याची कारणे देताना सीबीएसईच्या मते परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. त्याऐवजी एकदाच घ्यावी, असा विचार असल्याचे सांगण्यात आले. असे असताना परीक्षेच्या तारखा घोषित करणे अवघड असल्याने तारखेची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, परीक्षा ही जुलैमध्येच होणार असून, त्याबाबतची माहिती दिली जाणार असल्याच्या सूचना सीबीएसईने दिल्या आहेत. 
बातम्या आणखी आहेत...