आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या भूपाली देवरे ‘निफ मिसेस इंडिया 17’च्या उपविजेत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड या कार्यक्रमातील मिसेस इंडिया सौंदर्य स्पर्धेत नाशिकच्या भूपाली देवरे यांनी उपविजेतेपदाचा मुकूट पटकावला. 
 
नाशिक फिल्म फेस्टिव्हलचा हा नववा अवॉर्ड सोहळा जुहू येथील इस्कॉन हॉलमध्ये झाला. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे मेट्रो फाउंडेशन कलावैभव संस्थेच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांतील कलाकार, मान्यवर आणि ३३ देशांतील चित्रपट निर्मात्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

‘निफ मिस इंडिया’ आणि ‘निफ मिसेस इंडिया २०१७’ हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. मिसेस इंडिया सौंदर्य स्पर्धेत देशभरातून आलेल्या १८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. एकूण चार फेऱ्यांत ही स्पर्धा पार पडली. सर्वप्रथम रॅम्प वॉकमध्ये स्पर्धकांनी स्वत:ला सिद्ध केले. दुसऱ्या फेरीत गायन, नृत्य आणि वादन या कलांचे प्रदर्शन करीत प्रेक्षकांचे मन जिंकले. तृतीय फेरीत परीक्षकांनी स्पर्धकांना सामाजिक, राजकीय, वैयक्तिक असे प्रश्न विचारून त्यांची बौद्धिक चाचणी घेतली. या स्पर्धेत नाशिकच्या भूपाली देवरे उपविजेत्या ठरल्या. 

भूपाली यांनी माहिती तंत्रज्ञान विषयामध्ये एमबीए केले असून, त्या नाशिकच्या एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये बिझनेस मॅनेजर आहेत. संगीत आणि गायनाचीही त्यांना विशेष आवड असून पं. दसककर यांच्याकडे संगीत विशारदचे धडे घेत आहेत. विशेष म्हणजे निफतर्फे मार्चमध्ये नाशिक येथे घेण्यात आलेल्या मिसेस नाशिक स्पर्धेत भूपाली देवरे विजेत्या ठरल्या होत्या. 
बातम्या आणखी आहेत...