आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ माेटारसायकलींसह दाेन चाेरटे जाळ्यात, चाेरीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर- सिन्नरसह दिंडाेरी परिसरातून माेटारसायकल चाेरून विक्री करणाऱ्या दाेन चाेरट्यांना सिन्नर पाेलिसांनी शिताफीने अटक केली. चाेरलेल्या माेटारसायकली अकाेले तालुक्यातील चाेमदेववाडी येथील डाेंगर कपारीत लपवून ठेवल्या हाेत्या. तेथून नऊ माेटारसायकली पाेलिसांनी जप्त केल्या असून, अटक केलेल्या चाेरट्यांना न्यायालयाने पाेलिस काेठडी दिली अाहे. 
 
शनिवारी मध्यरात्री च्या सुमारास सिन्नर पाेलिस ठाण्याचे गस्ती वाहन घेऊन पाेलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक पाेलिस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार विजय गायकवाड, नितीन मंडलिक, शिपाई भगवान शिंदे, प्रवीण गुंजाळ, विनाेद टिळे, सचिन गवळी, काशीराम चवंडगीर गस्त घालत सिन्नर-घाेटी रस्त्यावर फिरत असताना घाेरवड गावाच्या शिवारात हाॅटेल साई उत्सवसमाेर लाल रंगाची हिराे पॅशन माेटारसायकल (एम. एच ४१ एफ २५५८) घेऊन एकजण दिसला. 
 
बाहेरच्या पासिंगचे वाहन घेऊन जाणाऱ्या या तरुणावर संशय अाल्याने निरीक्षक देशमुख यांनी त्यास हटकले असता ताे पळून जाऊ लागला. पाेलिसांनी त्यास शिताफीने झडप घालून ताब्यात घेतले. विसंगत उत्तरे देण्यातून त्याचे पितळ उघडे पडल्यावर त्यास पाेलिस ठाण्यात अाणून कसून चाैकशी केली असता त्याच्याकडील माेटारसायकल दिंडाेरी तालुक्यातून चाेरलेली असल्याचे निष्पन्न झाले. सखाेल चाैकशीतून त्याने मयूूर ऊर्फ समाधान विठ्ठल बाेंबले (२२, रा. भैरवनाथनगर, पाण्याच्या टाकीजवळ) असे त्याचे नाव पत्ता सांगितला अनेक माेटार सायकलींची चाेरी केल्याचे कबूल केले. 
 
या माेटारसायकलसाठी ग्राहकांच्या शाेधात अापण फिरत असल्याचे त्याने सांगितले. अकाेले तालुक्यातील चाेमदेववाडी येथील भरत बहिरू रावते हा या चाेऱ्यांत अापल्याला साहाय्य करत असून, चाेरीच्या माेटारसायकली त्याच्याच गावी डाेंगराच्या कपारीत लपविल्याचे त्याने सांगितले. त्यावरून पाेलिसांनी चाेमदेववाडी येथे जाऊन रावते यास अटक केली लपविलेल्या माेटारसायकलीही जप्त केल्या. 
 
या प्रकरणी जिल्हा पाेलिस अधीक्षक अंकुश शिंदे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड अाणि उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशाेर नवले यांच्या सूचनेवरून तपासकार्य करण्यात अाले. चाेरट्यांनी अजूनही माेटारसायकली चाेरल्या विकल्या असल्याची शक्यता असून, माेठे रॅकेट उघडकीस येण्याचीही शक्यता अाहे. 
बातम्या आणखी आहेत...