आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामकुंडातील निर्माल्य कलश गायब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- रामकुंड परिसरात निर्माल्य टाकण्यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र, सिंहस्थ पर्वण्या संपूनदेखील निर्माल्य कलश ठेवल्याने रामकुंड आणि गोदाघाटावर निर्माल्याचे ढिगारे साचल्याचे दिसून येत आहते. अनियमित घंटागाडीमुळे ढिगारे ‘जैसे थे’ असल्याने गोदाघाटावरील पवित्र वातावरण दूषित झाले आहे.
आरोग्य विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सिंहस्थ काळात अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन स्वच्छता केली जात होती. मात्र, सिंहस्थाची तिसरी आणि अखेरची पर्वणी संपल्यानंतर रामकुंड गोदाघाटाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. परिसरात ठिकठिकाणी निर्माल्याचे ढिगारे पडून आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून फक्त निर्माल्य स्वच्छ केले जाते. मात्र, घंटागाडी अनियमित असल्याने ढिगारे ‘जैसे थे’ आहेत.
सिंहस्थ वर्षभर सुरू राहणार आहे. देशविदेशातील भाविकांची रामकुंड परिसरात गर्दी होत आहे. परिसरातील नागरिकांनी आरोग्य विभागाकडे निर्माल्य कलश ठेवण्याची मागणी केली आहे. मात्र, निर्माल्य कलश तर सोडा, निर्माल्याचे ढिगारेदेखील उचलले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.

‘स्मार्ट सिटी’स्पर्धेतील नाशिकमध्ये डर्टी सिटीचे दर्शन
देशविदेशातीलनागरिकांचे तीर्थस्थान रामकुंड आहे. सिंहस्थ एक वर्ष सुरू राहणार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती बघता सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने परिसर अपवित्र वाटत आहे. देवांगजानी, गोदावरी नागरी सेवा समिती.

रामकुंड आणि परिसरात पसरलेल्या अस्वच्छतेला अारोग्य विभाग जबाबदार आहे. घंटागाडी ठेकेदाराला आरोग्य विभाग पाठीशी घालत आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. स्वच्छतेचे आदेश देऊ. सुनीताशिंदे, सभापती, पंचवटी प्रभाग
बातम्या आणखी आहेत...