आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाजपासून खाते असलेल्याच बँकेत बदलून मिळणार नाेटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साेमवार पासूनज्या बँकेत तुमचे खाते असेल त्याच बँकेत रद्द झालेल्या एक हजार पाचशे रुपयांच्या नाेटा बदलता येणार अाहेत. विशेष म्हणजे, रविवारी शहरातील बँकांबाहेरच्या कॅश डिपाॅझिट मशिन्ससमाेर रात्रीपर्यंत लाेकांनी रांगा लावल्या, तर स्टेट बँक, येस बँकेच्या एटीएमची सेवाही सुरू हाेती, ग्राहकांना दाेन हजार अाणि शंभर रुपयांच्या नाेटा येथे उपलब्ध हाेत हाेत्या. दरम्यान, शनिवारचा बहुजन शांती माेर्चाची गर्दी वाहतुकीतील बदल यामुळे अनेकांनी बँकेत जाणे टाळले, तर रविवारी बँका पाेस्टाला असलेली साप्ताहिक सुटी यामुळे मंगळवारी बँकांत खात्यात रक्कम भरणे नाेटा बदलण्यासाठी गर्दी हाेण्याची शक्यता अाहे.
सरकारने शनिवारी केवळ ज्येष्ठांना नाेटा बदली करून देण्याचा निर्णय घेतला हाेता, मात्र अनेक बँकांपर्यंत रविवारच्या मध्यरात्रीपर्यंत हा निर्णयच पाेहाेचलेला नव्हता. अशीच काहीशी स्थिती साेमवारपासून बँक खाते असेल त्याच बँकेत नाेटा बदली करता येणार असल्याच्या नव्या निर्णयाबाबतही पाहायला मिळते अाहे. रविवारी सायंकाळपर्यंत बँकांत याबाबतचे अादेश प्राप्त झालेले नसल्याने बँक अधिकारीही संभ्रमात हाेते. मात्र, साेमवारी सकाळी असे अादेश येण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मंगळवारीशहरात पाचशेची नाेट मिळणार : दाेनहजारांच्या नव्या नाेटांबाबत लाेकांमध्ये उत्सुकता पाहायला िमळत हाेती, अाता ती पाचशेच्या नव्या नाेटेबद्दल अाहे. व्यापाऱ्यांकडूनही या नाेटेची मागणी हाेत अाहे. यामुळे स्टेट बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेेकडे पाचशेच्या नाेटांची गरजेप्रमाणे मागणी नाेंदविली अाहे. यामुळे मंगळवारी शहरात बँक ग्राहकांच्या हाती नवी पाचशे रुपयांची नाेट पडेल, अशी शक्यता अाहे.

सहकारभारती देणार केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांना निवेदन :चलनबंदी अाणि नवीन नाेटांचे वितरण यासंदर्भात सहकारी संस्थांना दुय्यम वागणूक िमळत असून, ग्रामीण भागात विकास साेसायट्या, दुग्ध संस्था, विणकर संस्था अाणि शहरी भागात नागरी बँका अाणि पतसंस्थांना पुरेशा प्रमाणात नाेटा मिळाल्या पाहिजे. विशेष करून लहान रकमेच्या नाेटा सहकारी संस्थांना तातडीने मिळाल्या पाहिजेत. या संदर्भात अर्थ मंत्रालयाने रिझर्व्ह बँकेला स्पष्ट सूचना देणे अावश्यक असून, याकरिता सहकार भारतीचे शिष्टमंडळ अर्थ राज्यमंत्री संताेष गंगवार यांना साेमवारी (दि. २१ नाेव्हेंबर) भेटणार असल्याची माहिती सहकार भारतीचे संरक्षक सतीश मराठे यांनी िदली.

चलनात वाढल्या शंभराच्या नाेटा
सुरुवातीचा अाठवडा हा शंभर त्याखालील नाेटांच्या तुटवड्याने गाजला हाेता. थेट दाेन हजाराची नाेट लाेकांच्या हातात हाेती, पण त्याखाली थेट शंभर रुपयांची नाेटच उपलब्ध असल्याने अडचणींचा सामना करावा लागत हाेता. मात्र, अाता बँकांत दाेन हजार, तर सुरू असलेल्या एटीएममधून शंभर रुपयांच्या नाेटा मिळू लागल्या असल्याने बाजारातील शंभराच्या नाेटांचा तुटवडा थाेड्याफार प्रमाणात कमी हाेऊ लागला अाहे.
बातम्या आणखी आहेत...