आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- नायलॉनमांजा किती जीवघेणा ठरू शकतो याचा अनुभव एका दुचाकीस्वाराने घेतला. कामावर जाताना घडलेला प्रसंग थेट जीवावर बेतता बेतता राहिला. पतंग उडविणाऱ्याने नायलॉन मांजा वापरला आणि तोच मानेला लागून हा अपघात झाला. या दुचाकीस्वाराच्या मानेला ४० टाके पडले असून त्याची प्रकृती गंभीर अाहे. 
 
दीपक ठाकूर(२२) हा युवक खासगी रुग्णालयात नॊकरी करतो. सकाळी कामावर जात असताना वडाळा गाव येथे १०० फुटी रोडवर त्याच्या मानेला नायलॉन मांजामुळे कापले गेले. पतंग उडविणाऱ्याने पतंग खाली आली म्हणून किंवा कटली गेली म्हणून रस्त्यावरून मांजा ओढला. याच वेळी दीपक ठाकूर हा युवक आपल्या दुचाकीवरून जात होता. मांजा दिसला नसल्याने तो थेट मानेवरून घासला गेला. तो इतक्या जोरात घासला गेला की, मानच कापली गेली. या घटनेने दुचाकीचाही अपघात झाला. अपघातानंतर जमलेल्या नागरिकांनी दीपक यास खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे शहरात नायलॉन मांजा विक्री सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...