आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाेबीसी बांधवांवर अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवू- ओबीसी नेते अनिल महाजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओबीसी जनक्रांती परिषदेची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीस उपस्थित अाेबीसी नेते अनिल महाजन, माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजयराव बोरावके, विनायक यादव, मनोरमा पाटील, भगवान खैरनार यांच्या सह उपस्थित मान्यवर. - Divya Marathi
ओबीसी जनक्रांती परिषदेची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीस उपस्थित अाेबीसी नेते अनिल महाजन, माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजयराव बोरावके, विनायक यादव, मनोरमा पाटील, भगवान खैरनार यांच्या सह उपस्थित मान्यवर.
सिडको - ओबीसी-बहुजनहा देशाचा श्वास आहे, तो वाचला तर देश वाचेल. सर्वच राजकीय पक्षांकडून गेल्या ४० वर्षापासून ओबीसी-बहुजन समाजबांधवांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. यासाठी ओबीसी जनक्रांती परिषद लढणार आहे. जेथे जेथे ओबीसी-बहुजनांवर अन्याय होईल तेथे तेथे त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना धडा शिकवला जाईल, असा इशारा ओबीसी नेते अनिल महाजन यांनी दिला. 
 
नाशिकमध्ये ओबीसी जनक्रांती परिषदेची उत्तर महाराष्ट्र विभागीय महाबैठक रविवारी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रास्ताविक ओबीसी परिषदचे सल्लागार विनायक यादव यांनी केले. परिषदेची भूमिका मान्यवरांनी समजावून सांगितली. ओबीसी-बहुजन हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मान्यवरांनी आपले विचार मांडले. एकूण १५ ठराव एकमताने बैठकीत मंजूर करण्यात अाले असून ते राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहेत. 
 
प्रारंभी देशाच्या सीमेवर शहीद झालेले जवान आणि महाराष्ट्रातील आत्महत्या करणाऱ्या शेतकरी बांधवांना श्रध्दांजली वाहण्यात अाली. समाज प्रबोधन करणारे आधुनिक कीर्तनकार सत्यपालजी महाराज यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा बैठकीत यावेळी निषेध करण्यात अाला. यावेळी मनोरमा पाटील, भगवान खैरनार, विजय राऊत, भारती माळी, अनिल कोठुळे, भाऊसाहेब पवार अादींसह नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, औरंगाबाद येथील ओबीसी-बहुजन समाजबांधव उपस्थित होते. 
 
महाराष्ट्र माळी समाज महासंघाची बैठक : याच बैठकीत सुरुवातीला महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय महाबैठक पार पडली. महासंघाचे विश्वस्त, राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी, सर्व आघाडींचे प्रमुख, महिला आघाडी प्रमुख तसेच राज्यातील पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 
 
महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजयराव बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यावेळी महात्मा जाेतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे मुंबईत मोठे स्मारक व्हावे, असे एकूण ठराव बैठकीत मंजूर करण्यात अाले. 
बातम्या आणखी आहेत...