आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार आठवडे कांदा निर्यातबंदी करण्यासाठी केंद्राची पावले; पंतप्रधानांकडे प्रस्ताव, उद्या होणार निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक रोड- किरकोळ बाजारातील वाढत्या कांदा दरावर आळा घालण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने आगामी आठवड्यापासून चार आठवडे कांदा निर्यातबंदी वा किमान निर्यात मूल्य एक हजार डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय निर्यातदारांपुढे ठेवला आहे. पंतप्रधानांकडे याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला असून याबाबत बुधवारी (दि. २२) अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने कांदा उत्पादकांची गोची होणार आहे. 


बाजार समितीमध्ये कांदा अडीच हजार रुपयांच्या दरम्यान विक्री होत असताना केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाने किरकोळ बाजारातील कांदा दर कमी करण्यासाठी निर्यातीवर बंदी घालण्याचा घाट घातला आहे. काही निर्यातदार हे हवालाच्या माध्यमातून गोंधळ करीत असल्याचा अधिकाऱ्यांच्या बाजूने बैठकीमध्ये सूर निघाला. दिल्लीमध्ये किरकोळ बाजारात कांदा ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत असल्याने या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीसाठी राज्यातील कांदा निर्यातदार उपस्थित होते. 


यावेळी निर्यातदारांना बैठकीत सांगण्यात आले की, तोंडावर निवडणूक असल्याने ग्राहकांच्या विरोधात कोणतीही भूमिका घेऊ इच्छित नाही. तसेच निर्यातदार हवालाच्या माध्यमातून शासनाची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे निर्यात झाली नाही तरी शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल. बैठकीमध्ये चार आठवड्यांसाठी निर्यातबंदी घालण्यात येणार वा किमान निर्यातमूल्य एक हजार डाॅलर प्रति टन या दोन्हीपैकी एक निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच ज्या देशात कांदा निर्यात करायचा आहे त्यांच्याकडून पहिले पैसे आले तर त्याच निर्यातदाराला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे निर्यातदारांसमोर इकडे आड तिकडे विहीर अशी समस्या निर्माण झाल्याने त्यांनी यास विरोध केला आहे. वाणिज्य मंत्रालयातील संचालक एन. रमेश, अँग्रीक्ल्चर अॅण्ड काॅर्पोरेशनचे ट्रेड सल्लागार जी. एस. रेड्डी, कन्झुमर अफेअर्स प्रिन्सिपल अॅडवायझर संगीता वर्मा, अॅग्रीकल्चर काॅर्पोरेशन अॅण्ड फार्मर्स वेल्फेअरचे डाॅ. पी. शकील अहमद, नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, अॅग्रीकल्चर अॅॅण्ड प्रोसेस फूड प्रोड्युस एक्स्पोर्ट डेव्हलपमेंटचे अध्यक्ष डी. के. सिंग यांच्यासह निर्यातदार उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...