आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्यांनीच उधळला कांदा टंचाईचा डाव, लिलाव बंद करून घेणार हाेते फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीचा फायदा घेऊन बाजार समितीमधील कांदा लिलाव बेमुदत बंद करायचा. कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्यावर आपल्याजवळ असलेला कांदा बाजारात दामदुप्पट दराने विक्री करायचा हा जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांची डाव होता. मात्र, रविवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कांदा व्यापाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करताच काही व्यापाऱ्यांनी तत्काळ संप मागे घेऊन सोमवारपासून लिलाव सुरू करण्याचे सांगितले. यामुळे व्यापाऱ्यांनीच काही व्यापाऱ्यांचा कृत्रिम टंचाई करून दरवाढीचा डाव फसविला. 

जिल्ह्यातील सात बड्या कांदा व्यापाऱ्यावर प्राप्तीकर विभागाने धाडी टाकल्यानंतर उर्वरित व्यापाऱ्यांनी अघोषित बंद करून कांदा उत्पादकांना वेठीस धरले होते. त्यानंतर शनिवारी विंचूर येथे व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन सोमवारपासून बेमुदत बंदचा इशारा दिला होता. मात्र, जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाल्यानंतर रविवारीच बैठक घेत बंद मागे घेण्याचा आदेश दिला. या काही व्यापाऱ्यांनी त्वरित होकार देऊन सोमवारपासून लिलाव सुरू राहतील असे घोषित केले. नाशिक जिल्ह्यात १५ बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव होत असून प्रतिदिन सुमारे ८० ते लाख क्विंटल कांद्याची खरेदी विक्री होते. जिल्ह्यातील जमीन ही उन्हाळ कांद्यासाठी पोषक असल्याने हा कांदा सुमारे सहा ते सात महिने टिकतो. उन्हाळ कांदा चवीला तिखट, कडू असल्याने मागणी अधिक असल्याने ग्राहक आणि व्यापाऱ्यांकडून अधिक प्रमाणात पसंती दिली जाते. मात्र, दोन वर्षापासून उन्हाळ कांद्याला दर नसल्याने उत्पादक चिंतातूर झाले होते. यंदा २७ जुलै ७०० ते ८०० रुपये, आॅगस्ट रोजी १४०० ते १५०० रुपये तर आॅगस्ट रोजी कांदा दर २६०० ते २७०० रुपयांवर गेले होते. यावेळीही व्यापाऱ्यांनी मध्यप्रदेशात पावसामुळे कांदा खराब झाल्याचा लाभ घेत दरवाढ केली होती. या दरवाढीचा लाभ कांदा उत्पादकांऐवजी व्यापाऱ्यांना अधिक झाला होता. आॅगस्टला कांदा दर हजार ७०० रुपयांवर गेला असला तरी सरासरी दर हजार २०० रुपयेच होता. गुरुवारपासून जिल्ह्यात पुन्हा कांदा प्रश्न चर्चेला आला. यावेळीही फटका कांदा उत्पादकांनाच बसला आहे. जर व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद केला असता तरी तो फटका कांदा उत्पादकांनाच बसतो. व्यापाऱ्यांवर धाडी घातल्याने शासन व्यापार करू देत नसल्याच्या नावाखालीही उत्पादकांनाच फटका बसला असता. 

सोमवारपासून व्वापाऱ्यांच्या बेमुदत संपास काही व्यापाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण करून दरवाढीचा डाव उधलळा गेल्याचे समोर आले आहे. ज्यावेळी कांद्याला अधिक दर असेल तेव्हा कांदा वाहतुकीसाठी ठराविक व्यापाऱ्यांचाच कांदा रेल्वेने परराज्यात जातो. लहान व्यापाऱ्यांना मात्र यावेळी डावलले जाते. त्यामुळे व्यापाऱ्यांमधील फूट चव्हाट्यावर येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...