आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचार्यांनी घेतले अकरावी प्रवेशाचे धडे,, उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांसाठी बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीसाठीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन करण्याबाबत शासनाने दिलेल्या निर्णयानुसार या प्रक्रियेसंदर्भातील माहिती देण्यासाठी बुधवारी (दि. १५) प्राचार्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यात ही प्रवेशप्रक्रिया नेमकी कशी आणि कधी राबवायची याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. 
 
मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत होती. याच धर्तीवर २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षासाठी नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी १५ फेब्रुवारी रोजी केटीएचएम महाविद्यालयातील व्हीएलसी सभागृहात सर्व कनिष्ठ महाविद्यालय प्राचाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीमध्ये ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यशाळेमध्ये अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी शाळांनी ऑनलाइन प्रवेशासंदर्भात रजिस्ट्रेशन करणे त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची फाइल सादर करणे अनिवार्य आहे. यानंतर महाविद्यालयांत ऑनलाइन प्रवेशप्रक्रियांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. 

या प्रवेश प्रक्रियांसंदर्भात शालेय स्तरावर मुख्याध्यापकांनादेखील मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफे किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. जात प्रमाणपत्र आणि अन्य गरजेच्या कागदपत्रांच्या पडताळणीचे अधिकारही यावेळी शालेय मुख्याध्यापकांना दिले जाणार आहेत. या प्रवेशप्रक्रियेमध्ये २० टक्के जागा या महाविद्यालयांतील इन हाऊस (त्याच शाळेतील विद्यार्थी) प्रवेशांसाठी राखीव ठेवल्या जातील. यानंतर टक्के जागा या मॅनेजमेंट कोट्यासाठी राखीव असतील. कोणत्याही आरक्षणातील विद्यार्थी असला तरी त्यांला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे अनिवार्य असेल. यामुळे प्रवेशप्रक्रियेमध्ये पारदर्शकता येईल, अशी माहिती यावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली. या कार्यशाळेसाठी ऑनलाइन प्रवेशतज्ज्ञ मीनाक्षी राऊत, सहायक संचालक एम. एस. पाटील, सहायक शिक्षणप्रमुख पुणे महानगरपालिका एम. डी. आवारे, आर. जे. जाधव, दिलीप गोविंद, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नवनाथ औताडे आदींसह प्राचार्य शिक्षक उपस्थित होते. 

समुपदेशन केंद्रांची स्थापना 
विद्यार्थी आणि पालकांसाठी अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया नवीन असणार आहे. या प्रक्रियेसंदर्भात कोणतीही अडचण किंवा माहिती हवी असल्यास त्यांनी समुपदेशन केंद्रांची मदत घेता येईल. यासाठी गंगापूर विभागातील प्रमुख केंद्र केटीएचएम महाविद्यालय, कॉलेजरोडचे केंद्र व्ही. एन. नाईक महाविद्यालय, नाशिकरोड विभागातील केंद्र बिटको तर, सिडकोतील केंद्र वावरे महाविद्यालयात आणि पंचवटी विभागासाठी हिरे महाविद्यालयात पाचवे केंद्र राहणार आहे. 

दमछाक होणार नाही, पारदर्शक प्रक्रिया 
विद्यार्थ्यांना एरवी अकरावी प्रवेश म्हटले की, प्रत्येक महाविद्यालयांमध्ये भटकंती करावी लागत असे. एक नाही तर सातत्याने चकरा माराव्या लागत होत्या. प्रारंभी फॉर्म भरण्यासाठी आणि नंतर याद्या पाहण्यासाठीदेखील जावे लागते. ऑनलाइन पद्धतीने हा त्रास वाचणार आहे. तसेच, १०० टक्के प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने महाविद्यालयीन कामकाजात पारदर्शकता राहाणार असल्याची माहिती रामचंद्र जाधव यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...