आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅनलाइन गंडा: शेतकऱ्याचे 22 लाख बँक खात्यातून लंपास, वाचा कशी केली जाते फसवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नाशिक - देशात कॅशलेस इंडियाच्या माध्यमातून सर्व व्यवहार ऑनलाइन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अावाहन केले हाेते. त्यानुसार अाॅनलाइन व्यवहार वाढले अाहेत. मात्र या ऑनलाइन व्यवहाराचा सर्वसामान्य नागरिकांसहह शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अशाच प्रकारे ऑनलाइन व्यवहराचा फटका एका शेतकऱ्याला बसला अाहे. या शेतकऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल २२ लाख ७६ हजार रुपयांची रक्कम परस्पर दाेन बँकांमधील खात्यात वर्ग झाले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महामार्गावरील एका गावातील शेतकऱ्याने जमीन विक्रीचे २२ लाख ७६ हजार रुपये आयसीआयसीआय बँकेत ठेवले होते. डिसेंबर २०१६ ते एप्रिल २०१७ या दरम्यान संशयीत अवघेश कुमार सिंग यांच्या एसबीआय खात्यात त्यानंतर काही दिवसांनी ए. चक्रवर्ती याच्या पंजाब नॅशनल बँकेतील खात्यात २२ लाख ७६ हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने परस्पर जमा करण्यात आली. 
 
रक्कम परस्पर दुसऱ्या बॅंक खात्यात वळती हाेऊन अापली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या शेतकऱ्याने इंदिरानगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत संशयीतांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वरिष्ठ पाेलिस निरिक्षक सदानंद इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. देशात ऑनलाइन व्यवहारांसाठी आग्रह धरला जात असतांना दुसरीकडे मात्र या ऑनलाइन व्यवहारांचा सर्वसामान्य नागरिकांना असा माेठा फटका बसत आहे. 
 
तपास सुरु आहे 
- तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर क्राइम विभागाच्या मदतीने मदतीने तपास सुरू करण्यात अाला अाहे. ऑनलाइन फसवणूक झाल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्याने दिली आहे. तपास सुरू अाहे.
-सदानंद इनामदार, वरिष्ठ निरीक्षक, इंदिरानगर पोलिस ठाणे 
 
अशी केली जाते फसवणूक 
एटीएम कार्डचा पिन क्रमांक मिळवत त्या एटीएमचे बनावट एटीएम कार्ड तयार करून ऑनलाइन फसवणूक केली जाते. बँक ग्राहकाला फाेन करून बँकेेतून बाेलत असल्याचे सांगत खाते क्रमांक विचारून ग्राहकाच्या खात्यातून परस्पर रक्कम वर्ग केली जाते. याचप्रकारे बक्षीस लागल्याचे सांगून बँकेत ठरावीक रक्कम भरण्यास सांगून फसवणूक अशा विविध प्रकारे फसवणूक केली जात असल्याचे प्रकार घडले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...