आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवयवदान चळवळीला बळ, रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सुरू होणार समुपदेशन कक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अवयवदाना मुळेएखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो, रक्तदानापेक्षा श्रेष्ठदान असलेल्या अवयवदानाबाबत समाजात अद्याप प्रभावी जागृती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर नेत्रदानाच्या कार्यात विक्रमी कार्य असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाने आरोग्य विभाग रोटरी क्लब यांच्या सहकार्याने अवयवदानाच्या जागृतीसाठी अभियान हाती घेतले आहे.

अवयव निकामी झालेल्या व्यक्तींचा जीव वाचविण्यासाठी अवयव प्रत्यारोपण हा एकमेव उपाय असतो. देशात दरवर्षी दाेन लाख लोकांना किडनी एक लाख लोकांना लिव्हर प्रत्यारोपणाची आवश्यकता पडत असते. देशात अवयवदानासाठी प्रभावी जनजागृती नसल्याने अवयवदानासाठी लोक पुढे येत नाही.

अपघात झाल्यानंतर अथवा गंभीर आजाराने त्या रुग्णास कृत्रिम श्वासोच्छ‌्श्वासावर ठेवले जाते. दुर्दैवाने त्यात मेंदू मृत झाला, तर अशा रुग्णांचे अवयव दान करता येतात. व्हेंटिलेटरमुळे अशा रुग्णाचे हृदय चालू असते. शरीरास इतर अवयवांना रक्तपुरवठा सुरळीत चालू असतो सर्व अवयव काही तास जिवंत राहू शकतात. अशा वेळी रुग्णांचे नातेवाइक तयार असतील, तर त्याचे अवयव गरजू रुग्णांना प्रत्यारोपित केले जाते. जिल्हा रुग्णालयातही अशा आजारांचे रुग्ण येतात. या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी समुपदेशन कक्ष सुरू करण्यात येऊन अवयदानासाठी जनजागृती करण्याचे नियोजन सुरू आहे. नुकतेच रोटरी क्लब आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात अवयवदानासाठी जनजागृती फलक लावण्यात आले आहे. आजपर्यंत जिल्हा रुग्णालयात ४५ जणांनी नेत्रदान केले असल्याचे नेत्रशल्यचिकित्सक डॉ. इ. डी. सातदिवे यांनी सांगितले.

याअवयवांचे दान करता येणे शक्य : किडनी(मूत्रपिंड), लिव्हर (हृदय) डोळे, त्वचा, हृदयाचे व्हाॅल्व्ह हे अवयव मृत्यूनंतर दान करता येतात. तर जिवंतपणी दोनपैकी एक किडनी, हृदयाच्या काही पेशी, रक्त, बोनमॅरो ही अवयव दान करता येतात. हे अवयव काही आठवड्यात पुनर्निर्मित होऊन झालेली कमी भरून येते.

अवयवदानासाठी समुपदेशन कक्ष
जिल्हारुग्णालयात अवयवदानासाठी समुपदेशन कक्ष सुरू होणार आहे. येथे अवयवदानाबाबत रुग्णांच्या नातेवाइकांशी मोकळी चर्चा करून प्रभावी जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. अवयवदानासाठी रुग्णालयात सुविधा नाही. अशा रुग्णांना मेडिकल कॉलेज येथे अवयव प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध आहे. -डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक
बातम्या आणखी आहेत...