आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० हजार अनाथ बालकांना दिवाळीमध्ये ‘मायेची ऊब’! बालगृहातील मुलांची दिवाळी साजरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्यभरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या सुटीत बालगृहातील २० हजार अनाथ मुलांना आपल्या घरी नेऊन त्यांच्यासोबत ‘सार्थक दिवाळी’ साजरी केली आणि त्यांना मायेची ऊब दिली. त्यामुळे या मुलांना दिवाळीपुरते ‘घर’ मिळाले अन् त्यांची दिवाळी आनंदात साजरी झाली.
दिवाळी कुटुंबीयांसोबत साजरी करण्याची मजा काही अाैरच असते, परंतु अशी अनेक मुले अाहेत ज्यांना अाई-वडीलच नाहीत. अशा मुलांसाठी बालगृहांची व्यवस्था करण्यात अाली आहे. मात्र दाेन वर्षांपासून बालगृहांना भाेजन अनुदानच मिळाले नसल्याने त्यांची दिवाळी साजरी कशी करायची असा प्रश्न बालगृह चालकांसमोर होता. बालकाश्रम चालक संघटनेने इतर मुलांचे पालक, आप्तेष्ट, सामाजिक कार्यकर्ते यांना आवाहन केले. काही कार्यकर्त्यांनी या मुलांची दिवाळी अापल्या घरी साजरी करण्याची तयारी दर्शविली आणि दिवाळीच्या सुटीत सुमारे २० हजार मुलांना घरी नेले.
अाैरंगाबादेत ३७ मुलांची दिवाळी
अाैरंगाबाद येथील सातारा परिसरातील भगवानदादा बालिकाश्रम अाणि याेगेश्वरी बालकाश्रमातील अनुक्रमे २२ मुली अाणि १५ मुलांना अाई-वडील नाहीत. भाऊबिजेला नंदीग्राम साेसायटीच्या सदस्यांनी संपूर्ण दिवसभर अाश्रमातील मुलांना बाहेर नेऊन दिवाळी उत्साहात साजरी केली.
- कविता वाघ, बालिकाश्रम चालक
नगरमध्ये ६.५ हजार मुलांचा पाहुणचार
अहमदनगरमध्ये ५७ बालगृहांमध्ये सुमारे साडेसहा हजार मुले अाहेत. लायन्स क्लबचे सदस्य अाणि अन्य काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अनाथ बालकांना अापल्या घरी नेऊन त्यांचा पाहुणचार केला व उत्साहात दिवाळी साजरी केली.
- डाॅ. अरुण इथापे, अध्यक्ष, प्रियदर्शन संस्थेचे बालकाश्रम, अहमदनगर