आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पैठणीवर साकारले PM मोदी, साईबाबा आणि ओबामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - येथील पैठणी मराठमोळं वस्र असलं तरी ते सातासमुद्रापार लाडके ठरलं आहे. हे महावस्त्र, ज्याची नाजूकशी कलाकृती, लाखमोलाचं सौंदर्य महिलांना आपल्या प्रेमात गुंतवत आहे. कलात्मक बाज उठावदारपणामुळे कुणाच्याही मनात आदर निर्माण करणाऱ्या या महावस्रावर येथील एका हौशी तरुण विणकराने तब्बल तीन महिने खर्च करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, साईबाबा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रतिकृती विणल्या आहेत. ज्या व्यक्ती आदर्श वाटतात, त्यांना आपल्या कलाकृतीवर साकारण्याचे कसब या तरुणाला लाखमोलाचे वाटत आहे.

अस्सल सौंदर्य अन् कशिदाकारीमुळे कलात्मक परिधान केलेली स्त्री शंभरात उठून दिसते, एवढी या महावस्त्राची ताकद अाहे. येवला म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती नाजूकशी, कलाकृतींनी सजलेली, फुललेली अप्रतिम पैठणी. प्रत्येक स्त्रीमनावर अधिराज्य गाजविणारी स्त्रीचं रूप फुलविणारी अस्सल पैठणी बनते ती येवल्यातच. अस्सल पैठणीचा बाज टिकवून ठेवण्याचा प्रयत्न इथल्या प्रत्येक कलाकाराचा आहे. फॅशनच्या जमान्यातही या महावस्त्राचं मोल कमी होता वाढतच आहे. येथील विणकर वणीची सप्तशृंगीदेवी, कोल्हापूरच्या महालक्ष्मीसाठी पैठणी बनवून देतात. कल्पनाशक्तीला साद घालत पैठणीवर मोर, आसवलीचे फुले यांच्यासह महापुरुषांची चित्रेही काढली गेली आहेत. या पैठणीच्या इतिहासात आता आणखी एक मानाचा तुरा खाेवला जात आहे.

भक्तिभावातून लोक सोने-चांदीचे मौल्यवान दागिने आपल्या लाडक्या देवाला प्रिय व्यक्तीला अर्पण करतात. हाच हेतू ठेवून काही महिन्यांपूर्वी पैठणीवर साईबाबांची आरती विणकाम करणाऱ्या किरण देहाडे यांनी आता पैठणीच्या वस्रावर या तीन महान विभूती साकारल्या आहेत. हुबेहूब एखाद्या कागदावर साकारलेली हस्तकला वाटेल, अशी सुंदर कलाकृती पैठणीवर साकारली आहे. अस्सल सिल्कवर सोनेरी जरीत काळ्या रेशमाचे विणकाम आहे. प्रत्येक कलाकृतीला ३० हजारांचा खर्च आला आहे.

प्रेरणादायी असलेल्यांच्या भक्तीपोटी हा पैठणीवरील कारागीरीचा छंद जोपासत त्यांनी तीन महिने कष्ट केले. यामुळे नियमित पैठणी विणकाम मागे पडून माेठ्या प्रमाणात अार्थिक नुकसान झाले. मात्र, वेगळ्या कलाकृती साकारल्याचा आनंद वाटताे. या उपक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये व्हावी, अशी अपेक्षा आहे. या कलाकृती या तिघांना भेट देण्याचा किरणचा मानस आहे. यासाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून लवकरच मोदी यांना भेटणार असून, बराक ओबामा यांनाही भेट देण्याचा मनोदय किरण देहाडे यांनी व्यक्त केला.

चित्रअाकार रंग कालावधी
बराक ३० बाय सफेद २१ दिवस अाेबामा २८ इंच
नरेंद्र माेदी २१ बाय अाॅरेंज २७ दिवस ३४ इंच
साईबाबा ३० बाय अाकाशी ३० दिवस २८ इंच