आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुसूचित जमातींसाठी आठ सभापतिपदे राखीव,पंचायत समिती आरक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांपैकी ठिकाणची सभापतिपदे ही अनुसूचित जमातींसाठी राखीव झाली अाहेत. त्यातील चार महिलांसाठी तर अनुसूचित जातीच्या महिलेसाठी केवळ देवळा पंचायत समितीचे सभापतिपद राखीव झाले आहे. 
 
गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व पंधरा पंचायत समिती सभापतिपदांच्या आरक्षणांची सोडत काढण्यात अाली. त्यातील तब्बल अाठ तालुक्यांतील जागा या अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. दोन जागा या नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसींसाठी आणि चार जागा या खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती महिलेसाठी देवळ्याची एकच जागा राखीव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महिलांना ५० टक्के आरक्षणाच्या नियमानुसार १५ पैकी जागा या महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे उर्वरित सात जागांवर पुरुष उमेदवारांना नशीब आजमावता येईल. नियोजन भवनमध्ये आरक्षणे जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून दूरध्वनीद्वारे माहिती दिली जात होती. तसभापतिपदावर नजर लावून असलेल्यांची तयारी सुरू झाली आहे. 

{पेठ : अनुसूचितजमाती महिला 
{सुरगाणा: अनुसूचितजमाती महिला 
{दिंडोरी: अनुसूचितजमाती 
{त्र्यंबकेश्वर: अनुसूचितजमाती महिला 
{कळवण: अनुसूचितजमाती 
{इगतपुरी: अनुसूचितजमाती महिला 
{बागलाण: अनुसूचितजमाती 
{देवळा: अनुसूचितजाती महिला 
{सिन्नर: अनुसूचितजमाती 
{निफाड: नागरिकांचामागास प्रवर्ग 
{येवला: नागरिकांचामागास प्रवर्ग महिला 
{मालेगाव: सर्वसाधारणमहिला
{नांदगाव : सर्वसाधारणमहिला 
{नाशिक: सर्वसाधारण
{चांदवड: सर्वसाधारण 
बातम्या आणखी आहेत...