आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल विषारी दारूकांड : दोषारोपपत्र दाखल करण्यास न्यायालयाकडून मुदतवाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल  विषारी दारूकांडात  मोक्का दोषारोपपत्र दाखल करण्यास ११ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली  असून १९ संशयितांपैकी तिघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.  बुधवारी (दि.२) विशेष मोक्का न्यायालयात याप्रकरणी  सुनावणी झाली.
 
सीआयडी पुणे विभागाच्या पथकाने  १९ संशयितांविरोधात मोक्कान्वये  कारवाई केली आहे. सध्या  १९ जण मध्यवर्ती कारागृहात  आहेत. या सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्व संशयितांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.   
 
१२ फेब्रुवारी २०१७ रोजी पांगरमल येथे नगर जिल्हा  परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार सुरू होता. या काळात विविध पक्षांकडून मतदारांना  जेवणावळी व  मद्याच्या पार्ट्या दिल्या जात होत्या. यात पांगरमल येथे  मद्यपानातून  पन्नासहून अधिक  नागरिकांना विषबाधा झाली होती. यात सहा जणांचा  मृत्यू झाला होता. काहींना  अर्धांगवायू आणि अपंगत्व आल्याचा  गंभीर प्रकार उघडकीस  आला होता. पोलिस तपासात   शिवसेनेच्या स्थानिक  उमेदवाराने पार्टी दिली असल्याची धक्कादायक बाब पुढे आली होती. तत्कालीन  पोलिस अधीक्षकांनी  या गुन्ह्यात  १९ संशयितांना अटक केली आहे.    गुुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गृह विभागाने हा तपास सीआयडी कडे सुपूर्द केला होता. सीआयडीला तीन महिन्यांत १९ संशयितांच्या विरोधात मोक्कान्वये  कारवाई करण्याची परवानगी मिळाल्यानंतर नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात वर्ग करण्यात आला  आहे. 
 
दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर कोठडी    
- विषारी दारूकांडात मोक्का दोषारोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. तीन संशयितांना कोठडी मिळाली आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर इतर संशयितांची तपासकामी कोठडी घेण्यात येणार असून त्यांच्याकडे काही माहिती  मिळते का, याकडे लक्ष  राहणार आहे.    
अॅड. अजय मिसर, विशेष सरकारी वकील  
बातम्या आणखी आहेत...