आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: घरभेद्यांनीच राेखला भाजपचा माेठा विजय, पालकमंत्री महाजनांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीत भाजपला एेतिहासिक असा निर्विवाद बहुमताचा काैल नाशिककर जनतेने दिला असला तरी पक्षाला किमान ८० जागा मिळतील, अशी अपेक्षा हाेती. परंतु, पक्षातीलच काही लाेकांनी पक्षाला माेठ्या विजयापासून राेखल्याची खंत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. याचवेळी नकलाकारांना जनतेने नाकारत घरी बसविल्याचा टाेला राज ठाकरे यांचे नाव घेता लगावत नवनिर्वाचित नगरसेवकांनी विजयाने भारावून जाता विकासाच्या दृष्टीने पहिल्या दिवसापासून कामे हाती घ्यावीत, अशी सूचनाही त्यांनी सत्कार साेहळ्यात केली. शहराध्यक्ष अामदार बाळासाहेब सानप यांच्या अथक प्रयत्नामुळे हा विजय साकार झाल्याचेही त्यांनी म्हटले. 
 
नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ६६ जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांचा सत्कार महाजन पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ‘वसंतस्मृती’ कार्यालयात करण्यात अाला. याप्रसंगी महाजन यांनी निवडणूक निकालाचे विश्लेषण करताना म्हटले की, मतदानाच्या दिवसानंतर राजकीय विश्लेषक सर्वेक्षणाचे निकाल बघून चिंतेत पडलाे हाेतो. एकापाठाेपाठ एक विजयाचे निकाल एेकून विश्वासच बसत नव्हता. मात्र, पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने नाशिककरांविषयी ऋण व्यक्त करताे. पक्षाकडे इच्छुकांची संख्या माेठ्या प्रमाणात असताना सर्वांना संधी देणे शक्य नव्हते. निवडून येण्याची क्षमता हा निकष महत्त्वाचा होता. अाणखी किमान १५ ते २० जागा जिंकता अाल्या असत्या. पक्षांतर्गत काही हेवेदावेच अापल्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांनीही अात्मपरीक्षण करण्याची वेळ असल्याचेही महाजन यांनी सांगितले. पॅनलला मते मागण्याएेवजी काही ठिकाणी केवळ वैयक्तिक एकच मत मागितले गेल्याचेही समजले असून, त्याचे यथावकाश विश्लेषण केले जाईल. मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या विकासाचा शब्द दिलाय. ते लक्ष घालतीलच, तसेच नगरसेवकांनीही जनतेत उतरून कामे करावी. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे. महासभांना उपस्थित राहत चुणूक दाखवावी, अशा सूचनाही त्यांनी केली. व्यासपीठावर शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, संघटनमंत्री किशोर काळकर, वसंत गिते, सुनील बागुल, लक्ष्मण सावजी, अामदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अपूर्व हिरे, जिल्हाध्यक्ष दादा जाधव आदी उपस्थित होते. 
 
अनपेक्षित विजय, अद्यापही विश्वास बसत नाही 
नाशिककरांनी भरभरून दिलेल्या विजयावर अद्यापही विश्वास बसत नसून, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर हातात वृत्तपत्र वाचतानाही अाकडेमाेड बघत स्वत:लाच चिमटे काढून बघितल्याची प्रांजल कबुलीच महाजन यांनी मनाेगतात दिली. त्यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनीदेखील अनपेक्षित विजयाने भारावून गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. 
 
नकलाकारांना जनतेने जागा दाखवली 
जाहीर सभांमध्ये नकला करून दाखविणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. मुख्यमंत्र्यांच्या सभेपेक्षा जादा संख्या ठाकरेंच्या सभेला झाली, संगणकाद्वारे विकासाचे स्वप्न रंगविले. चित्रपट तारे-तारकांना नाशकात फिरवून मते मिळत नसल्याचे सांगून जनतेने त्यांना जागा दाखवून त्यांचेच भोग भोगायला लावले, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी मनसेवर ताेफ डागली. तर डरकाळ्या फोडणारे केव्हाच गप्प झालेत, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...