आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुनी पेन्शन याेजना लागू करण्याची मागणी, मुख्याध्यापक संघ टीडीएफचे शिक्षण उपसंचालकांना निवेदन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अंशदायी पेन्शन योजनेच्या विरोधात जे कर्मचारी न्यायालयात गेले, त्यांना जुनी पेन्शन याेजना लागू झाल्याने न्याय मिळाला. मात्र, दुसरीकडे जे कर्मचारी न्यायालयात गेले नाही त्यांच्यावर अन्याय होत असून, २००५ पूर्वीच्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी योजना लागू करावी, अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघ टीडीएफने शिक्षण उपसंचालक नवनाथ अौताडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

२००५ नंतर सेवेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू झाली आहे. २००५ पूर्वी सेवेतील कर्मचाऱ्यांनाही ही योजना लागू झाल्याने त्या विराेधात गेलेल्यांच्या बाजूने काेर्टाने निर्णय दिला जुन्या योजनेप्रमाणे कपात सुरू करण्याचे आदेश दिले. २००५ नंतर सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काही विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शिक्षणसेवक नव्याने रुजू झालेले आहेत. या बहुतांश कर्मचाऱ्यांना अल्प वेतन असून, त्यांना अंशदायी योजनेची कपात करताना मागील दोन ते तीन महिन्यांचा फरक म्हणून ते हजार रुपये कपात केले जात आहे. त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक अडचण उभी राहिली आहे. त्यामुळे २००५ पूर्वीच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यांसह अंशदायी पेन्शन योजनेतील कर्मचाऱ्यांची मागील महिन्यांची कपात टप्प्याटप्प्याने करावी, अशी मागणी टीडीएफचे जिल्हा कार्यवाह एस. बी. देशमुख, के. आर. काळे, चंद्रकांत कुशारे यांनी केली आहे.

वैद्यकीय बिले द्यावी
शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पी. एफ. स्लिपा त्वरित देण्यात याव्यात. वैद्यकीय बिलेही त्वरित अदा करावी, अशी मागणी यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.