आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नगरसेवकाकडून विनानिविदा पेस्ट कंट्राेलचा ठेका देण्याचा घाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्थायीत समितीत अन्य विभागाच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ताेफ डागणारे भाजपचे नगरसेवक जगदीश पाटील यांनी अाता पश्चिम विभागातील पेस्ट कंट्राेलचा ठेका विनानिविदा एका सामाजिक संस्थेला देण्याची खटपट चालवली असून, तसा ठराव केल्याचे धक्कादायक वृत्त अाहे. नियमानुसार, ५० हजारांपेक्षा अधिक खर्चाच्या कामासाठी निविदा काढणे अपेक्षित असताना विनानिविदा ठेका देण्याचा घाट अाता पश्चिम प्रभाग सभापती डाॅ. हेमलता पाटील यांनीच हाणून पाडण्यासाठी अायुक्तांना पत्र दिले अाहे. यानिमित्ताने भाजपची प्रतिमाही संकटात सापडली अाहे.  
 
स्थायी समितीत पेस्ट कंट्राेलच्या असमाधानकारक कामावरून जाेरदार अाराेप-प्रत्याराेप झाले. पुढील सभेत कामकाज अहवाल ठेवण्याचा निर्णय झाला. यात जगदीश पाटील अाघाडीवर हाेते. दरम्यान, अाता त्याअाडून अाता मर्जीतील संस्थेला विनानिविदा काम देण्याची धडपड सुरू झाली अाहे. सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रात नाशिकरोड, पंचवटी, नवीन नाशिक, सातपूर नाशिक पूर्व या पाचही विभागांत डास निर्मूलनाकरिता पेस्ट कंट्रोलचा ठेका मे. दिग्विजय एंटरप्रायजेस या मक्तेदार कंपनीला निविदा प्रक्रियेद्वारे दिला आहे. नाशिक पश्चिम विभागातील डास निर्मूलनाचे काम महापालिकेच्या मलेरिया विभागातील ३२ कर्मचाऱ्यांमार्फत केले जात आहे. कर्मचारी कमी असले तरी समाधानकारकरित्या सुरू असलेले काम ठेकेदाराला देण्याचे घाटत अाहे. मुळात ठेेकदारी पद्धतीच्या कामाविराेधात स्थायी समितीच अाक्रमक असताना भाजपचे सदस्य जगदीश पाटील यांनी नाशिक पश्चिम विभागातील पेस्ट कंट्रोलचा ठेका विनानिविदा साई स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, नाशिक या संस्थेला देण्याचा ठराव केला आहे. पश्चिम विभागातील पेस्ट कंट्रोलच्या कामासाठी मनपाचे मलेरिया विभागातील कर्मचारी कमी पडत असल्याचे कारण देत या संस्थेला काम देण्याचा ठराव झाल्यामुळे पाटील यांच्याकडूनच नियमांना बगल दिली जात असल्याचे स्पष्ट झाले अाहे. मुख्य म्हणजे पाटील पंचवटीतून निवडून अाले असताना पश्चिम विभागातील पेस्ट कंट्राेलसाठी तत्परता का, असाही सवाल केला जात अाहे. याबाबत हेमलता पाटील यांनी अाक्षेप घेत ठेका द्यायचा असेल तर निविदा का काढली जात नाही असाही सवाल केला अाहे. अाता अायुक्त काय करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार अाहे. 

बेकायदेशीर ठराव कशासाठी? 
^पश्चिम प्रभाग समितीत पेस्ट कंट्राेलचा ५० हजारांपुढील ठेका देण्याचा बेकायदेशीर ठराव अाहे. विनानिविदा काम देणे बेकायदेशीर असून, खराेखरच या भागातील अाराेग्याची तळमळ असेल तर निविदा काढून काम देणे अपेक्षित अाहे. आयुक्तांना पत्र दिले असून, विनानिविदा पेस्ट कंट्रोलचा ठेका देण्यास विरोध आहे. -डॉ. हेमलता पाटील, सभापती, नाशिक पश्चिम विभाग. 
 
बातम्या आणखी आहेत...