आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्राेलियम कंपन्यांना ‘अच्छे’, सामान्यांचे ‘बुरे दिन’; साेशल मीडियात सरकारवर टिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नाशिक - पेट्राेलियम कंपन्यांनी १६ जूनपासून दरराेज पेट्राेल अाणि डिझेलचे दर बदलण्याचा निर्णय अंमलात अाणला, त्यादिवशी शहरात ७५ रुपये २५ पैसे प्रति लिटर असणारे पेट्राेलचे दर रविवारी, १० सप्टेंबर राेजी ७९ रुपये ६३ पैशांवर पाेहाेचले अाहे. डिझेलची दरवाढही सामान्यांची डाेकेदुखी ठरत असून हे दर प्रति लिटरला रुपये ५२ पैशांनी वाढले अाहेत. अांतरराष्ट्रीय बाजारात क्रूड अाॅइलचे दर सातत्याने घटत असले तरी स्थानिक बाजारात मात्र हे दर वाढतच चालल्याने तेल कंपन्यांना ‘अच्छे’ तर सामान्यांना मात्र ‘बुरे’ दिन अाल्याची चर्चा सुरू असून अामचे अच्छे दिन कधी येणार? असा संतप्त सवाल अाता जनता एकमेकांना विचारू लागली अाहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र माेदी सत्तेत अाले तेव्हा अांतरराष्ट्रीय बाजारातील दरांनूसार पेट्राेल-डिझेलचे दर स्थानिक बाजारात दर पंधरा िदवसांनी बदलायचे पेट्राेलियम कंपन्यांचे धाेरण हाेते त्यावेळी क्रूड अाॅइलचे दर ११० डाॅलर प्रती बॅरलच्या अासपास हाेते. त्यानंतर २०१५ मध्ये हेच दर अगदी ३०-३२ डाॅलर प्रती बॅरलपर्यंत खाली अाले मात्र स्थानिक बाजारात अाॅइल कंपन्यांनी याप्रमाणात दर कमी केलेच नाहीत. या दर घटण्याचा थेट फायदा जनतेला सरकारने िमळू दिला नाही अशी टीकाही त्यावेळी पहायला मिळाली. तर क्रुड अाॅईलच्या अायातीवर सर्वाधिक विदेशी चलन खर्च हाेते, त्यामुळे ही विदेशी चलनाची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकारला याप्रश्नी सहकार्य करावेच लागेल, असा बचाव काही तज्ज्ञ करतांना दिसत हाेते. 
 
यानंतर यावर्षी १६ जूनपासून पेट्राेल-डिझेलचे दर दरराेज बदलायचा निर्णय अाॅइल कंपन्यांनी घेतल्यानंतर अाज केवळ ८८ दिवसात अांतरराष्ट्रीय बाजारात क्रूड अाॅइलच्या किमती बहुतांश दिवशी सातत्याने कमी हाेत असून, ५२ ते ५७ डाॅलर प्रती बॅरल अशा असतांनाही स्थानिक बाजारात मात्र पेट्राेलच्या किंमती रूपये ३८ पैशांनी वाढल्या अाहेत. यामुळे अाधीच महागाईच्या रहाटगाडग्यात भरडत असलेल्या सामान्यांच्या संतापाचा उद्रेक हाेईल की काय अशी स्थिती पाहायला मिळते अाहे. 
 
..तर अधिभारही घटवा : साेशल मीडियात सरकारवर टिका 
विशेष म्हणजे, सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महामार्गालगतची मद्य विक्रीची दुकाने बंद झाल्याचा फटका सरकारी तिजाेरीला बसणार असल्यानेच सरकारने पेट्राेलवर भरमसाठ अधिभार वाढविल्याची जाेरदार चर्चा हाेती, मात्र अाता राज्यांत बहुतांश मद्य दुकाने पुन्हा सुरू झाल्याने हा अधिभार सरकार कमी करणार का? असा प्रश्न विचारला जावू लागला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...