आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिमंडळ 1 व 2 साठी दोन स्वतंत्र युनिट; वाढणार गुन्हे शाखेचे बळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पोलिस अधिकाऱ्यांचा खांदेपालट झाल्याने पोलिस ठाण्यांना नवीन अधिकारी मिळाले खरे, मात्र त्यांच्यासमोर आता वाढते गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान असेल. 
 
शहर पोलिस आयुक्तालयातील आडगाव, म्हसरूळ, इंदिरानगर, भद्रकाली, उपनगर, मुंबईनाका, देवळाली कॅम्प या पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलण्यात अाले अाहेत. सोनसाखळी चोरीचे सर्वाधिक गुन्हे उपनगर, मुंबईनाका आणि आडगाव, इंदिरानगर या पोलिस ठाण्यात दाखल आहेत. गुन्हे दाखल असलेल्या पाेलिस ठाण्यात उपनगर ठाणे अग्रेसर आहे. मात्र आजपर्यंत उपनगर पोलिसांनी एकही सोनसाखळी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला नाही, हे विशेष. त्याखालाेखाल मुंबईनाका आणि आडगाव पोलिस ठाणे अाहे. या हद्दीतही सर्वाधिक सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडतात. या सर्व अधिकाऱ्यांवर आता गंभीर गुन्हे रोखण्यासह सोनसाखळी, घरफोडी आणि चोरीचे गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान असेल. सातपूर, अंबड, पंचवटी आणि नाशिकरोड या पोलिस ठाण्यालाही अनुभवी (गुन्हे) निरीक्षक मिळाले आहेत. 
वाहतूक विभागालाही वरिष्ठ निरीक्षक मिळाले आहेत. नंदकिशोर इथापे, विनायक लोहकरे, कैलास पाटील, संजय बांबळे यांच्यावर शहर वाहतूक विभागाची धुरा असेल. नियुक्ती दिलेले हे सर्व अधिकारी आयुक्तांच्या विश्वासास कसे पात्र ठरतात, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. 
 
पोलिस प्रशासनाचा कणा समजला जाणाऱ्या गुन्हे शाखेची ताकद अाता वाढली आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गुन्हे शाखा युनिट बरखास्त करून मध्ये विलीन केले. यामुळे गुन्हे शाखेचे बळ पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. आता परिमंडळ मधील पोलिस ठाण्यांची जबाबदारी युनिट आणि परिमंडळ मधील पोलिस ठाण्यांची जबाबदारी युनिट सांभळत असल्याने या दोन्ही युनिटवर तातडीने गुन्हे उघडकीस अाणण्याचे आव्हान असेल. 

पोलिस खात्यात गुन्हे शाखेला सर्वाधिक महत्त्व आहे. गुन्हे शाखेच्या बळावर किचकट गुन्हे उघडकीस अाणले जात असतात. त्यामुळे असे गुन्हे उघडकीस येण्यासाठी स्वतंत्रपणे काम करणारी गुन्हे शाखा ही नेहमी अधिक सक्षम असणे गरजेचे असते. त्यादृष्टीनेच पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेत गुन्हे शाखा युनिट बरखास्त करून ते युनिटमध्ये विलीन केले अाहे. यामुळे या दोन युनिटचे संख्याबळही अाता वाढणार आहे. 

युनिट मधील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न सुटणार 
अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा अतिरिक्त ताण कर्मचाऱ्यांवर पडत हाेता. परिणामी, शहरातील वाढते गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण घटू लागले होते. युनिट कडे परिमंडळ मधील भद्रकाली, पंचवटी, सरकारवाडा, मुंबईनाका, आडगाव, म्हसरूळ, गंगापूर या सात पोलिस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी राहणार आहे. तर परिमंडळ २मधील नाशिकरोड, देवळाली कॅम्प, उपनगर, अंबड, सातपूर, इंदिरानगर या सहा पोलिस ठाण्याची जबाबदारी युनिट सांभळणार आहे. 

या वरिष्ठ निरीक्षकांनी स्वीकारला पदभार... 
आडगाव- सुनील पुजारी, म्हसरूळ- सुभाषचंद्र देशमुख, इंदिरानगर- फुलदास भोये, देवळाली कॅम्प- सुभाष डवले, भद्रकाली- मंगलसिंग सूर्यवंशी, मुंबईनाका- सुनील नंदवाळकर, उपनगर- बाजीराव महाजन या अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. 

यांच्यावर असेल धुरा... 
१०वर्षानंतर गुन्हे शाखेचे बळ वाढल्याने या दोन्ही युनिटवर आता गुन्हे उघडकीस आणण्याचे आव्हान असेल. उपायुक्त (गुन्हे) विजय मगर, वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहळदे, नीलेश माईनकर यांच्यासह कर्मचाऱ्यांवर गुन्हे शाखेची धुरा असेल. 

गुन्हे शाखेला अधिक सक्षम करणार 
^गुन्हेशाखेचे दोन स्वतंत्र युनिट असल्याने परिमंडळ मधील पोलिस ठाण्यातील गुन्हे त्वरित उघडकीस आणणे शक्य होणार आहे. काम करण्यास अधिक संधी मिळणार आहे. गुन्हे शाखेचे युनिट अधिक सक्षम करण्याचा अामचा प्रयत्न राहणार आहे. -डॉ. रवींद्र कुमार सिंगल, पोलिस आयुक्त, नाशिक 
बातम्या आणखी आहेत...