आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फौजदाराच्या बेताल वक्तव्याने तणाव, दगडफेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नशिराबाद (जि. जळगाव)- बकरी ईदनिमित्त आयोजित नमाज पठणाच्या कार्यक्रमात पोलिस उपनिरीक्षक आर. के. नगराळे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नशिराबादेत शुक्रवारी प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

धार्मिक भावना दुखावणाऱ्या वक्तव्यामुळे संतापलेल्या मुस्लिम समाजातील असंख्य नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको, घोषणाबाजी केली. काही अज्ञात लोकांनी दगडफेकही केली, त्यात दोन ट्रकच्या काचा फुटल्या. दरम्यान, परिस्थितीत हाताबाहेर जावू नये म्हणून पोलिसांनी तातडीने पावले उचलत जादा बंदोबस्त गावात तैनात केला.आता परिस्थिती आटोक्यात आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे नगराळे यांना तत्काळ अटक करण्यात आले. सायंकाळी त्यांची जामिनावर सुटका झाली. तसेच त्यांना पोलिस खात्यातून तडकाफडकी निलंबितही करण्यात आले. तर रास्ता रोको,दगडफेक करणाऱ्या सुमारे १०० जणांविरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात आता तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे.