आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायीसह स्वीकृतसाठी विराेधी पक्षांची माेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीत भाजपच्या झंझावातापुढे धराशायी झालेल्या मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस अपक्षांनी अाता एकत्रित माेट बांधण्याची तयारी सुरू केली असून स्थायी समिती, शिक्षण, महिला बालकल्याण समितीवर प्रतिनिधीत्वासाठी विभागीय अायुक्तांकडे एकत्रित गट नाेंदवण्याचे प्रयत्न सुरू केले अाहेत. या पक्षांचे एकत्रित संख्याबळ २१ पर्यंत असून, त्याद्वारे निदान काही महत्त्वाची पदे भाजप शिवसेनेकडून खेचणे शक्य हाल, अशी नीती यामागे अाहे. 
 
यावेळच्या महापालिका निवडणुकीच्या अनपेक्षित निकालामुळे एकेकाळी सत्ता गाजवणारे हे प्रमुख पक्ष गाेंधळात पडले अाहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप शिवसेनेची निश्चितच लाट हाेती. मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसला अनेक ठिकाणी बऱ्यापैकी उमेदवारही मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांची अवस्था नाजूक हाेण्याची भाकिते अाधीच वर्तवली गेली हाेती; मात्र या तिन्ही पक्षांची काही ठिकाणची पॅनल मजबूत हाेती. त्यामुळे प्रत्येक पक्षाचा स्वत:चा अाकडा १० ते १५ इतका हाेता. हे तिन्ही पक्ष मिळून किमान ३५ च्या पुढे जातील, अशी अटकळ हाेती; मात्र भाजपने स्पष्ट बहुमताकडे सहजी मुसंडी मारल्याचा सर्वाधिक फटका या तिन्ही पक्षांना बसला. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी सहा, मनसेचे पाच तर अपक्ष चार नगरसेवक निवडून अाले. 
पुढील काळात प्रमुख पदे भाजपकडे जाणार हे जवळपास निश्चित झाले अाहे. महापाैर, उपमहापाैर, स्थायी समिती सभापतीसह शिक्षण, महिला बालकल्याण सभापतिपदही जाणार अाहे. मात्र, या समित्यांचे सदस्यपद तरी मिळण्यासाठी विराेधकांना एकत्रित माेट बांधणे गरजेचे झाले अाहे. त्यासाठी विभागीय अायुक्तांकडे एकत्रित नाेंदणीसाठी काही ज्येष्ठ नगरसेवकांचे प्रयत्न सुरू अहेत. 
 
असा हाेईल फायदा 
स्वीकृत नगरसेवक पदासाठी १२२ नगरसेवक भागिले पाच याप्रमाणे २४ नगरसेवकांमागे एक स्वीकृत असे सूत्र अाहे. भाजपचे ६६ सदस्य असल्यामुळे त्यांना दाेन स्वीकृत नगरसेवकपदे मिळवता येतील. त्यानंतरही त्यांचे १८ नगरसेवक उरत असून, तिसऱ्या स्वीकृतसाठी भाजपला सहा नगरसेवकांची गरज लागेल. शिवसेनेकडे ३५ नगरसेवक असून त्यांचा एक स्वीकृत नगरसेवक निश्चित अाहे. त्याव्यतिरिक्त ११ नगरसेवक उरत अाहेत. अशा परिस्थितीत शिवसेना भाजप एका जागेसाठी एकत्रित अाले तर त्यांचे स्वीकृत सदस्य चार हाेतील. दुसरीकडे राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस अपक्ष अशी एकत्र माेट बांधली तर २१ सदस्य हाेत असून, निवडणूक अविराेध करण्यासाठी संबंधित अाघाडीला एक स्वीकृत देण्याची खेळी भाजप करू शकेल. स्थायी शिक्षण समितीसाठी १२२ भागिले १६ याप्रमाणे सात सदस्यांमागे एक जागा देण्याचे सूत्र अाहे. भाजपचे ६६ नगरसेवक असून त्यांचे स्थायी समितीवर नऊ सदस्य जातील. शिवसेनेचे ३५ असल्यामुळे त्यांचे पाच सदस्य जातील. याव्यतिरिक्त दाेन सदस्य काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेच्या काेट्यातून जातील. त्यासाठी एकत्रित माेट बांधून वर्षनिहाय संबंधित पक्षांना सदस्यपद देण्याचा फाॅर्म्युला अाणण्याबाबत चर्चा सुरू अाहे. 
बातम्या आणखी आहेत...