आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरच्यांचे टाेमणे, अभद्र युती केल्यास हाेईल मनसेसारखी गत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अादेश संस्कृती जाेपासणाऱ्या शिवसेनेत अाता स्थानिक निर्णयांवरून काही पदाधिकाऱ्यांसह अंगीकृत संघटनांनी एल्गार पुकारला अाहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अाणि अारपीअाय या पक्षांशी वा त्यांच्या नेत्यांशी युती करू नये अशा मागणीचे निवेदन या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सेनेचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांना दिले अाहे. ‘या पक्षांशी युती केल्याने घरचे, अर्थात अामच्या कुटुंबातील लाेक नेहमीच अाम्हाला टाेमणे मारतात.’ असे सांगत ‘यापुढे अभद्र युती कराल तर मनसेसारखी अवस्था शिवसेनेची हाेईल’ असा टाेलाही संबंधित पदाधिकाऱ्यांनी निवेदनात स्थानिक पदाधिकाऱ्यांना लगावला अाहे. 
 
शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख, विभागप्रमुख यांच्यासह भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या निवेदन देत शिवसेनेच्या कार्यपद्धतीवरच अाक्षेप नाेंदविला अाहे. महापालिका निवडणुकीनंतर पक्षातील याच पदाधिकाऱ्यांनी शिवसेना कार्यालयात स्वतंत्र मेळावा घेत स्थानिक नेतृत्वाला घरचा अाहेर दिला हाेता. त्यानंतर अाता निवेदन देत पदाधिकाऱ्यांनी अापल्या भावनांना वाट माेकळी करून दिली अाहे.
 
निवेदनात काय म्हटले? 
नाशिकमधील तमाम शिवसैनिकांच्या मनातील अाक्राेश तुमच्यासमाेर मांडत अाहाेत. महापालिकेत सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, अारपीअाय या पक्षांशी काेणत्याही प्रकारची युती करू नये. तसेच सत्तेसाठी लाचार हाेऊ नये. कारण निवडणूक काळात या पक्षांच्या विराेधात प्रचार करीत शिवसैनिक रक्ताचे पाणी करीत असतात. जर अापण या पक्षांशी सत्तेसाठी युती केली तर शिवसैनिकांच्या मनावर विपरीत परिणाम हाेऊन ताे नाराज हाेईल. अामच्या घरचे नातेवाइक शिवसैनिकांना नेहमी टाेमणे मारतात, की तुम्ही ज्यांच्याशी भांडता त्यांच्याबराेबरच तुमचे स्थानिक नेते सत्तेसाठी एकत्र येतात. यामुळे शिवसेनेची प्रतिमा जनतेच्या मनात मलिन हाेत अाहे. शिवसेनाप्रमुखांनी सत्तेसाठी कधीही घाणेरडी तडजाेड केली नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांनीही महापालिकेत कुठल्याही प्रकारची युती करू नये.
 
महापालिका निवडणुकीत शिवसैनिकांना डावलून बाहेरच्यांना उमेदवारी दिल्यामुळे माेठा फटका बसूनयेणारी सत्ता हातातून गेली अाहे. पुढच्या एक ते दीड वर्षात लाेकसभा विधानसभेच्या निवडणूका हाेत अाहेत. अशी युती जर महापालिकेत झाली तर अापण जनतेसमाेर कुठल्या प्रकारे प्रचार करायचा? कारण हेच पक्ष शिवसेनेच्या उमेदवारासमाेर उभे राहणार अाहे. याने जनतेचा शिवसेनेवरील विश्वास उडेल. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना स्वबळावर सत्ता अाणण्याचे अादेश दिले अाहेत. त्याप्रमाणे अापण महापालिकेत अभद्र युती करु नये ही शिवसैनिकांची मागणी अाहे. महापालिकेच्या गत निवडणुकीत मनसेने अशीच अभद्र युती केली हाेती. म्हणून जनतेने मनसेला नाकारले. तशी वेळ शिवसेनेवर येऊ नये, अशी शिवसैनिकांची इच्छा अाहे. निवेदनावर भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख याेगेश बेलदार, सेनेचे उपमहानगरप्रमुक राजेंद्र क्षिरसागर, भाविसे प्रमुख संदीप गायकर, विभागप्रमुख अमाेल सूर्यवंशी, देवा जाधव, गाेटू चाेरडिया, स्वप्नील पासले, मंगेश पवार, रितेश साळवे, अरिहंत सिसाेदिया, मयुर पगार, नरेश ढाेले, ललीत वाघ, मयुर जुन्नरे, धनेश फुलसुंगे, साहिल मनियार, मनाेज सावंत अादींची नावे अाहेत. 
 
शिवसेनेची कामकाजाची पद्धत बघता अादेश संस्कृतीचा पगडा अधिक असून स्थानिक पातळीवर काेणाशीही युती करायची असेल तर त्याबाबत निर्णय पक्षश्रेष्ठींकडे पाठवून अंतिम झाल्याचे अनेक वेळेला बघायला मिळाले अाहे. अगदी महिन्यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेससाेबत युती करुन अध्यक्षपद मिळविण्याचा निर्णय याच पद्धतीने घेण्यात अाला हाेता. असे असतानाही शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेने थेट महानगरप्रमुखांना जाहीर निवेदन देत ताे तपशील माध्यमांपर्यंत पाेहाेचविण्याची दाखविलेली तत्परता हा चर्चेचा विषय ठरली अाहे. या कार्यकर्त्यांमागचा बाेलविता धनी काेण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत अाहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेत उफाळलेली गटबाजी तर याला कारणीभूत नसेल, अशीही शंका व्यक्त केली जात अाहे. 

पक्षप्रमुखांपर्यंत पाेहाेचवू भावना 
^शिवसेनेत सर्व निर्णय पक्षप्रमुख घेत असतात. ताे अधिकार त्यांचाच अाहे. मात्र, कार्यकर्त्यांच्या काही भावना असतील तर त्या पक्षप्रमुखांपर्यंत पाेहाेचविण्यात येईल. -अजय बाेरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना 
बातम्या आणखी आहेत...