आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: उच्चभ्रू वसाहतीत हुक्का पार्लरसह अवैध धंद्यांचा वाढला सुळसुळाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या गंगापूरराेड, काॅलेजराेड अाणि समर्थनगर, महात्मानगर परिसरात गेल्या काही दिवसांत हाॅटेल, कॅफेच्या नावाखाली सर्रासपणे हुक्का पार्लर, गांजा अाेढणाऱ्यांसाठी अधिकृतपणे जागा उपलब्ध करून देत अवैध धंदे थाटले अाहेत. विशेष म्हणजे, पाेलिस अायुक्तांच्या सरकारी निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावरच हे व्यवसाय सुरू असून, या ठिकाणी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीच माेठ्या संख्येने तासनतास हुक्का, दारू, गांजा पीत असल्याचे धक्कादायक चित्र बघावयास मिळत अाहे.
 
दरराेज रात्री १० वाजेनंतर नित्यनियमाने संबंधित पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह या ठिकाणाहून सायरन वाजवित गस्त घालतात. मात्र, या सर्व अनधिकृत प्रकाराकडे निमूटपणे ते बघत असल्याने व्यावसायिकांशी त्यांचे ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याचीच परिसरातील रहिवाशांमध्ये चर्चा सुरू अाहे. 
 
 
नाशिक पाेलिस अायुक्तालयाची सूत्रे स्वीकारतानाच रवींद्र सिंगल यांनी गुन्हेगारी नियंत्रणाबराेबरच अवैध धंदे कुठल्याही परिस्थितीत चालू देणार नसल्याची ग्वाही शहरवासीयांना दिली हाेती. त्याचबराेबर अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला हाेता. काही प्रमाणात त्याची अंमलबजावणीही केली गेली. सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या अावळण्याबराेबरच सण-उत्सव असाे की महापालिकेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. परिमंडळ एक अाणि दाेनचा स्वतंत्रपणे कारभार सांभाळणाऱ्या उपअायुक्त अाणि सहायक अायुक्तांनीदेखील त्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांवर नियंत्रण अाणण्यासाठी त्यांच्या प्रसंगी ‘वराती’ काढल्या. त्या कारवाईचे सर्वच स्तरातून स्वागत हाेत असले तरी सद्यस्थितीत प्रमुख अधिकारी जणू सुटीवर गेल्यासारखे दिसत अाहे. घरफाेड्या, साेनसाखळी चाेरीचे गुन्हे नियंत्रणात अाणण्यात पूर्णपणे यश कधीही येणार नसले तरी त्यांचे प्रमाण कमी करण्यातही यंत्रणेला फारसे यश अालेले दिसत नाही. 

रस्त्यावरच वाहनांमध्ये केले जाते मद्यपान, तरुणांचा धांगडधिंगा 
गंगापूर राेड,काॅलेजराेड, भाेसला सर्कल, जेहान सर्कल ते समर्थनगर, महात्मानगर, एबीबी सर्कल, कृषीनगर जाॅगिंग ट्रॅकसह अासारामबापू पूल या भागात हाॅटेल्स, कॅफेच्या बाहेर रस्त्यावरच कार उभ्या करून त्यात काच बंद करून मद्यपान केले जाते. या मद्यपान करणाऱ्या कारचालकांना अथवा रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकाने हाॅर्न वाजविल्यास त्याच्याशीच वाद घातला जाताे. माेठ्या अावाजात गाणे वाजवून अारडाअाेरड केली जाते. याच मार्गावरून गंगापूर पाेलिसांचे वाहन वारंवार सायरन वाजवून निघून जाते. मात्र, अधिकारी-कर्मचारी खाली उतरून कारवाई करण्याचे धाडस दाखवित नसल्याने त्यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जातो. काही रहिवाशांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधित कॅपेचालकांशी त्यांचे मधुर संबंध असल्याचे उघडपणे बालले जाऊ लागले अाहे. याबाबत अायुक्त नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे. 
 
एकीकडे अायुक्तांकडून तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळू नये यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षा, सायकलिंग, मॅरेथाॅनसह खेळांमध्ये प्रावीण्य मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करीत असतात. कुठलेही भेटवस्तू, पुष्पगुच्छ स्वीकारता त्याएेवजी पुस्तके भेट देण्याचे अावाहन करतात. यातून अद्ययावत वाचनालय तयार केले अाहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच नियंत्रणाखालील वरिष्ठ अधिकारी तरुणांच्या वाढत्या व्यसनाधीनतेकडे दुर्लक्ष करीत असल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे. गंगापूर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक हुक्का पार्लर, गांजासह वेगवेगळ्या नशा करण्यासाठी टपऱ्या, हाॅटेल, कॅफेमध्ये सर्रासपणे तासन््तास घाेळके बसलेले दिसतात. सदरची बाब निरीक्षकांच्या लक्षात अाणून दिल्यावरही ते त्या हाॅटेल्सला कॅपेला हुक्का पार्लरसाठी परवानगी असल्याचे सांगतात, जणू त्यांना अवैध धंद्यांचे लायसनच त्यांनी प्रदान केल्याच्या अाविर्भावात सांगतात. ज्या ठिकाणी परवानग्या अाहेत तिथेही नियमांचे पावलाेपावली उल्लंघन हाेते. याबराेबरच मसाज पार्लरच्या नावाने देहविक्रीचा व्यवसायही सुरू अाहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...