आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्जी बाबाअाेंकी तो ये पहली लिस्ट है, अाैर अाएंगी- नरेंद्रगिरी महाराज यांनी केला गौप्यस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘फर्जी बाबाअाेंके कारनामाेंसे साधू समाज अाैर हिंदू धर्म बदनाम हाे रहा है इसलिए अभी ताे केवल १४ पाखंडी बाबाअाेंके नाम की लिस्ट दी है ये ताे केवल पहली लिस्ट है, अभी ताे अाैर अानेवाली है अशा शब्दात अखिल भारतीय अाखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी ‘दिव्य मराठी’ला माहिती देतानाच भविष्यात अजून काही भाेंदू बाबांची नावे जाहीर करणार असल्याचा गाैप्यस्फाेट केला. अखिल भारतीय अाखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज यांनी या भाेंदू बाबांच्या नावांचा प्रस्ताव ठेवला होता. भाविकांनी भोंदू बाबांच्या नादी लागू नये, असे अावाहन त्यांनी केले अाहे. 
 
साधूसमाजामध्ये गृहस्थाश्रमींचे कामच नाही साधूब्रह्मचारी असतात. त्यामुळे साधू समाजात गृहस्थाश्रमींचे काहीच काम नाही. अशा स्वरुपाच्या छंदीफंदी भाेंदूंची बाबा बनण्याची प्रक्रिया सुरु झाल्यामुळे अाणि सामान्य लाेकांची दिशाभूल केल्यामुळेच सारा घाेळ हाेऊन बसला असल्याचेही नरेंद्रगिरी महाराज यांनी नमूद केले. 
 
धर्माचीबदनामी टाळण्यासाठी यादी 
अातापर्यंतअनेक भाेंदू बाबा जे काही करत हाेते, ते प्रकर्षाने पुढे अाले नव्हते. त्यामुळे अशांवर काही कारवाईचा प्रश्नच नव्हता. जे साधू विचित्र वागतात, त्यांच्यावर कुंभमेळ्यातदेखील निलंबनाची कारवाई केली जाते. मात्र, अाता तर हे भाेंदू बाबा अशाप्रकारे वागत अाहेत, की ज्यामुळे संपूर्ण धर्माचीच बदनामी हाेत अाहे. त्यामुळेच यादी जाहीर करीत असल्याचेही महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी नमूद केले. 
 
भूमिका समर्थनीय : भोंदू बाबांचा पर्दाफाश होणे गरजेच होते. भाविकांची फसवणूक थांबली पाहिजे, असे मत नाशिकच्या कैलास मठाचे प्रमुख स्वामी संविदानंद सरस्वती यांनी व्यक्त करुन आखाडा परिषदेच्या भूमिकेचे समर्थन केले. 
 
नरेंद्रगिरी म्हणतात... 
- सर्व एेशाेराम भाेगणारे, विलासी जीवन जगणारे बाबा साधू नव्हेत 
- या भाेंदूंवर अंकुश लावण्यासाठीच जाहीर केली यादी 
- हे सर्व पाखंडी असून त्यांच्या नादी लागू नका 
-  घरदाराबराेबरच जाे सर्वस्वाचा त्याग करताे ताे साधू

पुढील काम शासनाने करावे 
- सर्व संगपरित्याग करणारे साधू असतात. मात्र, काही लबाडीने किंवा कुणाला लालूच दाखवून साधूंच्या वेशात समाजाची दिशाभूल करतात. अशांना राेखणे अत्यावश्यक हाेते. त्याबाबत मी १५ वर्षांपासून अाखाडा परिषदेकडे पाठपुरावा करीत हाेताे. भाेंदू साधूंवर आता कारवाई करणे शासनाचे काम अाहे.
-महंतडाॅ. बिंदू महाराज, त्र्यंबकेश्वर 
बातम्या आणखी आहेत...