आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींकडून नोटप्रेस कामगारांचे आभार, नाेटबंदी काळातील विशेष कामाचे केले काैतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या भेटीप्रसंगी खासदार हेमंत गाेडसे मुद्रणालय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ. - Divya Marathi
नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या भेटीप्रसंगी खासदार हेमंत गाेडसे मुद्रणालय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ.
नाशिक - नोटबंदीच्याकाळात नोटप्रेस कामगारांनी केलेल्या विशेष मेहनतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आभार मानत कामगारांचे कौतुक केले अाहे. 
 
भारत प्रतिभूती चलार्थपत्र मुद्रणालयाचे विस्तारीकरण आधुनिकीकरणाबाबत मोदी यांची खासदार हेमंत गोडसे यांच्या मध्यस्थीने मुद्रणालय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे भेट घेतली. त्यावेळी मोदी यांनी भारतीय अर्थव्यस्थेला अडचण येऊ नये म्हणून नोटप्रेस कामगांरानी घेतलेल्या मेहनतीची प्रशंसा केली. यावेळी त्यांना दिलेल्या निवेदनात सीएनपी प्रेसच्या आधुनिकीकरणासाठी अतिरिक्त इन्टॅग्लिओ मशीन, आॅनलाइन-ऑफलाइन एक्झामिनेशन मशीन देण्याची मागणी करण्यात आली.
 
आयएसपी पासपोर्टमधील एचएयूव्ही फिल्म बसविण्याचे काम केंद्राच्या आरपीओ विभागाला देता आयएसपीकडेच ठेवावे, अशीही विनंती केली. यावेळी मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गाेडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, सुनील आहिरे, राजेश टाकेकर, शिवाजी कदम,जयराम कोठुळे, उल्हास भालेराव, रमेश खुळे, दिनकर खर्जुल, कार्तिक डांगे, दीपक दिंडे, प्रकाश घायवटे आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. यावेळी मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अर्थमंत्री अरुण जेटली, अर्थराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल गृहमंत्री राजनाथ सिंग यांचीही भेट घेतली. 
बातम्या आणखी आहेत...