आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: सरकारच्या याेजनेचीच हाेईना प्रसूती, गर्भवतींना फेऱ्या मात्र अंमलबजावणीलाच अव‘कळा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात प्रसूतीवेळी महिला मृत्यूचे असलेले मोठे प्रमाण कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी गेल्या ३१ डिसेंबरला गर्भवतींच्या खात्यावर थेट हजार रुपये जमा करण्याची प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान ही योजना जाहीर केली. परंतु, अाज तीन महिने उलटूनही योजनेच्या अंमलबजावणीची सूचना केंद्राकडून राज्य शासनाला मिळाली नसल्याची बाब डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आली आहे. ही योजना नेमकी कोणत्या विभागामार्फत राबविली जाणार आहे याचीदेखील माहिती अधिकाऱ्यांना नाही. घोषणेनंतर या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तसेच योजनेच्या माहितीसाठी शेकडो महिला शासकीय रुग्णालयांत फेऱ्या मारतात अन‌् रिकाम्या हाती परततात, यावर डी बी स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत... 
 
प्रसूतीच्या वेळी महिलांना हाेणारा त्रास अाणि बऱ्याचवेळी बाळाचा वा गर्भवतीचा हाेणारा मृत्यू याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ३१ मार्च राेजी नववर्षासाठी भेट म्हणून ‘प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान’ ही याेजना सुरू केली. गेल्या तीन महिन्यांत या याेजनेची माहिती घेत घेत अनेक महिलांची प्रसूती झाली, पण या याेजनेची अद्यापही प्रसूती झालेली नाही. 

सुरक्षित मातृत्वासंबंधी या योजनेत देशातील सर्व ६५० पेक्षा अधिक जिल्ह्यांतील गर्भवतींना रुग्णालयात प्रसूती, लसीकरण आणि पौष्टिक आहार मिळणार असून, त्यासाठी सहा हजारांची मदत दिली जाणार आहे. सध्या देशातील ५३ जिल्ह्यांतील गर्भवतींना प्रत्येकी चार हजारांची मदत दिली जाते. परंतु, घोषणेनंतर बरेच दिवस उलटूनही योजना कागदावरही अाली की, नाही हा देखील संशाेधनाचा विषय ठरेल. कारण या याेजनेबाबत राज्यात अजून केंद्राकडून काहीच कळवलेले नाही. अधिकाऱ्यांच्या तर ही याेजना कानीदेखील अालेली दिसत नाही. या योजनेसंदर्भात रोज शेकडो महिला सरकारी रुग्णालयांमध्ये फेऱ्या मारतात मात्र, त्यांना काेणतीही माहिती मिळत नाही. एवढेच काय तर याबाबत आरोग्य विभागासह महिला बाल कल्याण विभागालाही माहिती नसल्याने नेमकी ही योजना कोणत्या विभागामार्फेत राबविली जाणार हाच अाता संशाेधनाचा विषय असल्याचे डी.बी.च्या पाहणीत दिसून आले. 
 
योजनेची जनजागृती नाही 
महापालिकेच्या किंवा जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतींचे प्रमाण वाढवणे, माता अर्भक मृत्यू कमी करणे, हा जननी सुरक्षा योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. या वर्गातील गरोदर मातांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या सर्व सेवा आरोग्य विभागामार्फत पुरवल्या जातात. जनजागृती नसल्याने त्याचा लाभ मिळत नसल्याचे चित्र डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आले. 
 
पुढील स्लाईडवर वाचा,  अधिकारीच अनभिज्ञ, अंगणवाडीतही मिळेना माहिती, 
अशी अाहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व याेजना आणि खाजदार व आमदार यांची प्रतिक्रिया...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...